Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

पंडित राम नारायण यांचे निधन

पंडित राम नारायण यांचे निधन

पंडित राम नारायण यांचे निधन

  • प्रख्यात सारंगीवादक पंडित रामनारायण यांचे वयाच्या 96 वर्षी निधन झाले.
  • सारंगीला लोकसंगीतामधून शास्त्रीय संगीतामध्ये मानाचे स्थान देणारा कलाकार म्हणून राम नारायण ओळखले जातात .
  • त्यांना 2005 यावर्षी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
  • सारंगीवर अतिशय कुशलतेने खयाल सादर करणारे पंडित नारायण यांनी मुघले आजम पाकीजा आणि काश्मीर की कली यासारख्या चित्रपटांच्या संगीतालाही सारंगीचा सास चढावला होता.
  • पंडित राम नारायण यांचा जन्म राजस्थानमधील उदयपूर जवळच्या आमेर गावी 25 डिसेंबर 1927 रोजी झाला.
  • त्यांचे वडीलही गायक होते.
  • त्यांचे आजोबा आणि पणजोबा उदयपूरच्या महाराणांच्या दरबारातील गायक होते.
  • आपल्या वडिलांच्या प्रोत्साहनाने उदयपूरचे सारंगी वादक उदय लाल यांच्याकडे त्यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून सारंगीचे धडे गिरवायला सुरुवात केली. लखनौचे गायक माधव प्रसाद यांनी त्यांना ख्याल अंगाची दीक्षा दिली.

हरमनप्रीत सिंग वर्षातील सर्वोत्तम खेळाडू

  • आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या (एफआयएच) वार्षिक पुरस्कारांवर भारतीय खेळाडूंची मोहोर ठसठशीतपणे उमटली.
  • भारताचा हॉकी कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पी. आर. श्रीजेश यांची अनुक्रमे वर्षातील सर्वोत्तम खेळाडू आणि गोलरक्षक म्हणून निवड करण्यात आली.
  • ‘एफआयएच’च्या 49 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दोघांच्या पुरस्कारावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विशेष म्हणजे या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी दोघांची तिसऱ्यांदा निवड झाली.
  • यापूर्वी दोघांना 2020- 21 आणि 2021-22 अशी सलग  दोन वर्षे हा पुरस्कार मिळाला होता.

इतर पुरस्कार विजेते खेळाडू:

  • यिब्बी यान्सेन (सर्वोत्तम महिला खेळाडू, नेदरलँड्स)
  • ये जिआओ(सर्वोत्तम गोलरक्षक, चीन),
  • सुफायन खान(उदयोन्मुख पुरुष खेळाडू, पाकिस्तान),
  • झो डियाझ (उदयोन्मुख महिला खेळाडू, अर्जेंटिना),
  • जेरोएन डेल्मी (सर्वोत्तम पुरुष प्रशिक्षक, नेदरलँड्स),
  • अॅलिसन अन्नान (महिला प्रशिक्षक),
  • स्टीव रॉजर्स (सर्वोत्तम पंच, ऑस्ट्रेलिया),
  • सारा विल्सन (महिला पंच, स्कॉटलंड).

पंकज अडवाणीचे 28 वे जगज्जेतेपद

  • भारताच्या पंकज अडवाणीने 28 वे जागतिक विजेतेपद जिंकण्याचा पराक्रम केला.
  • त्याने जागतिक बिलियर्डस स्पर्धा सलग सातव्यांदा जिंकून हे यश मिळवले.
  • त्याने दोहा येथे झालेल्या निर्णायक सामन्यांत इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलचा 4-2 असा पराभव केला.
  • पंकज 2016 पासून जागतिक स्पर्धेत विजेता आहे.
  • 2020 आणि 2021मध्ये करोनामुळे स्पर्धा झाली नव्हती. त्याने गुणांच्या स्वरुपात बाजी मारली आहे. त्यात प्रथम दीडशे गुण जिंकणारा फ्रेम जिंकतो. एकूण सात फ्रेममध्ये चुरस होते. त्याने दुसऱ्या फ्रेममध्ये 147 गुणांचा ब्रेक करीत आपली क्षमता दाखवली.

 झेलेन्झी नीरज चोप्राचे प्रशिक्षक

  • भारताचा सुपरस्टार आणि ऑलिंपिक सुवर्ण, रौप्यपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने नव्या हंगामासाठी आपले प्रशिक्षक म्हणून चेक प्रजासत्ताकाच्या यान झेलेन्झी यांची नियुक्ती केली आहे.
  • 58 वर्षीय झेलेन्झी हे भालाफेकीत आधुनिक काळातील सर्वोत्तम समजले जातात. ऑलिंपिक आणि विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहेत.
  • टोकियो ऑलिंपिकध्ये नीरजने सुवर्णपदकाची कामगिरी, त्यानंतर काही महिन्यांपूर्वी झालेल्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत त्याने रौप्यपदक मिळवले होते.
  • झेलेन्झी हे नीरजचे आयडॉल राहिलेले आहेत. त्यांनी ऑलिंपिकमध्ये तीन आणि जागतिक विक्रमासह स्पर्धेत विजेतेपद मिळवलेले आहे.
  • झेलेन्झी यांनी जर्मनीत 1996 मध्ये 48 मीटरचा जागतिक विक्रम केलेला आहे. तो अजूनही कायम आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *