Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

फेंगल चक्रीवादळ

फेंगल चक्रीवादळ

फेंगल चक्रीवादळ

  • बंगालच्या उपसागरातील अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आणखी वाढून ‘फेंगल’ चक्रीवादळ तयार झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी)  जाहीर केले.
  • हे चक्रीवादळ 30 नोव्हेंबर रोजी तमिळनाडू आणि पुदुच्चेरीची किनारपट्टी ओलांडणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’ ने वर्तवला
  • विषुववृत्तीय हिंदी महासागर आणि लगतच्या दक्षिण बंगालच्या उपसागरामध्ये 23 नोव्हेंबरला कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. त्याची तीव्रता 25 नोव्हेंबरला डिप्रेशनपर्यंत वाढली.
  • श्रीलंकेच्या पूर्व किनारपट्टीला समांतर वायव्येकडे संथपणे सरकणाऱ्या या क्षेत्रामुळे गेल्या चार दिवसांत श्रीलंका आणि तमिळनाडूमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली.

फेंगल

  • फेंगल या शब्दाचा अर्थ आहे उदासीन, हा अरेबिक भाषेतला शब्द आहे.
  • चक्रीवादळाचे नाव ‘फेंगल’ सौदी अरेबियाने प्रस्तावित केले होते आणि त्याचे मूळ अरबी भाषेतून घेतले आहे.
  • हे नाव भाषिक वारसा आणि सांस्कृतिक ओळख यांच्या मिश्रणाचे प्रतीक आहे, जागतिक हवामान संघटना (WMO) आणि युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर आशिया अँड द पॅसिफिक (UNESCAP) नामकरण पॅनेलमधील प्रादेशिक विविधतेवर जोर देतं.

आशा काळे यांना गदिमा पुरस्कार जाहीर

  • गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना 2024 चा गदिमा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
  • अभिनेत्री प्रिया बेर्डे यांना विद्याताई माडगूळकर स्मृती गृहिणी-सखी- सचिव पुरस्कार, प्रसिद्ध कथा- पटकथा-संवादलेखक व गीतकार क्षितिज पटवर्धन यांना चैत्रबन पुरस्कार, तर प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल यांना विद्या प्रज्ञा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
  • आधुनिक महाराष्ट्राचे वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त 14 डिसेंबर रोजी टिळक स्मारक मंदिर येथे पुरस्कार प्रदान केले जातील.
  • गदिमा पुरस्कार कवी ग.दि.माडगूळकर यांच्या स्मरणार्थ गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येतो.
  • गदिमा पुरस्काराबरोबरच काही अन्य पुरस्कारही देण्यात येतात. एखाद्या क्षेत्रातील उदयोन्मुख नवोदिताला चैत्रबन पुरस्कार देण्यात येतो. तर 1995 पासून ग.दि.माडगूळकरांच्या पत्नी कै.विद्याताई माडगूळकर यांच्या नावाने गृहिणी-सखी-सचिव पुरस्कार देण्यात येतो.
  • गजानन दिगंबर माडगूळकर(1 ऑक्टोबर 1919 – 14 डिसेंबर 1977) हे विख्यात मराठी कवी, गीतकार, लेखक आणि अभिनेते होते.
  • ते त्यांच्या नावाची आद्याक्षरे ग.दि.मा. या नावाने लोकप्रिय आहेत. गदिमांची सर्वात उल्लेखनीय रचना असलेल्या गीतरामायणाची बऱ्याच भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत.
  • गीतरामायण या त्यांच्या सर्वात उल्लेखनीय कलाकृतीमुळे त्यांना सध्याच्या काळातील आधुनिक वाल्मिकी देखील म्हणले जाते.

डॉ. बंग दांपत्याला  लिजेंड्सपुरस्कार

  • कर्नाटकातील श्री सत्यसाई विद्यापीठ संस्थानद्वारे सत्यसाई ग्राम, मुदेनहुली, कर्नाटक येथे आरोग्य क्षेत्रातील मानवी उत्कृष्टतेसाठी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय व डॉ. राणी बंग या जोडप्याला ‘द लिजेंड्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • सत्यसाईबाबांच्या 99 व्या जयंतीनिमित्त 23 नोव्हेंबरला मुधुसुदन साई आणि डॉ.सी.श्रीनिवासन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • बंग दांपत्याने गडचिरोली जिल्ह्यात ‘सर्च’ संस्थेच्या माध्यमातून गेल्या 38 वर्षात लाखो रुग्णांना वैद्यकीय सेवा, जागतिक मान्यता मिळालेले आरोग्य संशोधन, दारू व तंबाखू कमी करण्यासाठी मुक्तिपथ हा जिल्हाव्यापी कार्यक्रम, युवांसाठी निर्माण व तारुण्यभान हे उपक्रम राबविले आहेत.
  • बालमृत्यू कमी करण्याची त्यांनी सांगितलेली पद्धत भारत सरकारद्वारे ‘आशा’ योजनेद्वारे पूर्ण भारतात अंमलबजावणी केली जाते.
  • डॉ.अभय व डॉ.राणी बंग यांना यापूर्वी महाराष्ट्र भूषण व पद्मश्री सन्मान प्राप्त असून जवळपास 70 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
  • ‘टाइम’ मॅगझिनने (अमेरिका) त्यांना ‘ग्लोबल हेल्थ हिरो’ म्हणून 2005 मध्ये सन्मानित केले. तर द लॅन्सेट ने त्यांना ‘द पायोनिअर्स इन रूरल हेल्थ केअर’ म्हणून गौरविले आहे.

इच्छामरणाला ब्रिटनमध्ये प्राथमिक मान्यता

  • इंग्लंड आणि वेल्स या प्रांतात असाध्य रोगामुळे मरणासन्न अवस्थेत असलेल्या प्रौढ रुग्णांना इच्छामरणाचा अधिकार देण्याऱ्या विधेयकाला ब्रिटिश खासदारांनी  प्राथमिक मंजुरी दिली.
  • या विधेयकावर संसदेत जोरदार चर्चा झाल्यानंतर खासदारांनी ‘असिस्टेड डाइंग बिल’ 330 विरुद्ध 275 मतांनी मंजूर केले.
  • या विधेयकाला खासदारांची तत्त्वतः मंजुरी मिळाली असून, आता या विधेयकावर संसदेत अधिक अभ्यास केला जाईल.
  • 2015 मध्ये असे विधेयक मांडण्यात आले होते परंतु त्याला मंजुरी मिळाली नव्हती.
  • मरणासन्न अवस्थेत असणाऱ्यांना या विधेयकामुळे सन्मानपूर्वक मरण पत्करण्याचे स्वातंत्र्य मिळेल. त्यांना अनावश्यक वेदना, त्रास, दुःख सहन करावे लागणार नाही, असे आग्रही मत विधेयकाला समर्थन देणाऱ्यांचे आहे.
  • खासदार किम लीडबीटर यांनी संसेदत हे विधेयक सादर केले. ‘आपण इथे जीवन की मृत्यू अशा पर्यायांची निवडीचे स्वातंत्र्य देत नाही, तर मृत्यू कशा प्रकारे यावा, याची मोकळीक रुग्णाला देणार आहोत,’ याकडे लीडबीटर यांनी लक्ष वेधले.
  • तर ,डॅनी क्रूगर यांनी विधेयकाच्या विरोधात भूमिका घेतली.

चीनमध्ये सोन्याची सर्वात मोठी खाण

  • सोन्याचा जगातील सर्वांत मोठा साठा आता चीनमध्ये सापडला आहे. या खाणीचे मूल्य 83 अब्ज अमेरिकी डॉलर असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
  • दक्षिण आफ्रिकेतील ‘साउथ डीप’ खाणीला मागे टाकून हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा सोन्याचा साठा आहे, ज्यात सुमारे 900टन साठा आहे.
  • चीनमध्ये सापडलेल्या या खाणीमध्ये उच्च प्रतीच्या खनिजाचा साठा असल्याचा अंदाज आहे.
  • चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिले आहे.
  • हुनान प्रांताच्या भूवैज्ञानिक विभागाने याबाबतचे शोधकार्य केले.
  • पिंगजियांग भागात ही खाण आहे.
  • भूगर्भशास्त्रज्ञांनी दोन किलोमीटर खोलीवर सोन्याचे 40 पट्टे शोधले आहेत.
  • दरम्यान, सोन्याच्या या नव्या खाणीच्या शोधाचा चीनच्या सोने उद्योगावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
  • सध्या चीन जागतिक पातळीवर सोन्याच्या उत्पादनात आघाडीवर आहे.
  • जगातील सोन्याच्या बाजारपेठेत चीनचा दबदबा असून 2024 मध्ये चीनकडे दोन हजार टनांपेक्षा जास्त सोन्याचा साठा असल्याचे मानले जात होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *