Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

राष्ट्रीय बाल दिन

राष्ट्रीय बाल दिन

राष्ट्रीय बाल दिन

  • भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 14 नोव्हेंबरला बालदिन साजरा केला जातो
  • बालदिन हा १९५६ पासून २० नोव्हेंबर रोजी ‘युनिव्हर्सल चिल्ड्रन्स डे’ म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाच्या अनुषंगाने साजरा करण्यात येत होता पण भारतात ७ मे १९६४ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले, त्याच वर्षी संसदेत १४ नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा करण्याची एकमताने घोषणा करण्यात आली, तेव्हापासून बालदिन १४ नोव्हेंबर रोजी भारतात साजरा केला जात आहे.
  • 2024 मध्ये जागतिक बालदिनाची थीम: ‘भविष्य ऐका’

समांथा हार्वे यांच्या ऑर्बिटलला बुकर

  • ब्रिटीश लेखिका समांथा हार्वे यांना ‘ऑर्बिटल’ कादंबरीला 2024 चा बुकर पुरस्कार मिळाला आहे.
  • ‘ऑर्बिटल’ ही बुकर जिंकणारी अवकाश क्षेत्रावर आधारित पहिलीच कादंबरी आहे.
  • 2024 च्या पुरस्कारासाठी विचार झालेल्या लेखकांमध्ये महिलांचे वर्चस्व पाहायला मिळाले.
  • पुरस्काराची रक्कम 50 हजार पौंड इतकी आहे.
  • या कादंबरीच्या कथानकाचा संपूर्ण कालावधी 24 तास आहे आणि तिच्या पृष्ठांची संख्या केवळ 136 इतकी आहे.
  • आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील सहा अंतराळवीर आणि त्यांचा एक दिवसाचा प्रवास या कथेवर आधारित असलेली ही कादंबरी 2024 मधील ब्रिटनमधील सर्वोच्च खपाचे पुस्तक ठरले आहे.
  • हे अंतराळवीर पृथ्वीवरील 16 सूर्योदय आणि सूर्यास्ताचे निरीक्षण करतात.
  • या कालावधीत ते विविध खंडांवर मार्गक्रमण करतात आणि विविध ऋतू त्यांना पाहायला मिळतात.
  • लंडन शहरातील ओल्ड बिलिंग्जगेट येथे 12 नोव्हेंबर रोजी एका समारंभात हार्वे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
  • ‘ऑर्बिटल’ हे बुकर पारितोषिक जिंकणारे हे दुसऱ्या क्रमांकाचे छोटे पुस्तक आहे.
  • परीक्षकांमध्ये ब्रिटिश भारतीय संगीतकार नितीन साहनी, कादंबरीकार सारा कॉलिन्स, ‘द गार्डियन’चे फिक्शन संपादक जस्टिन जॉर्डन आणि चिनी अमेरिकी लेखक-प्राध्यापक यियुन ली यांचा समावेश होता.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *