जयसिंगराव पवार यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर
- यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2024 ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांना जाहीर झाला आहे.
- दोन लाख रुपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- यशवंतराव चव्हाण यांच्या 40 व्या पुण्यतिथी दिने 25 नोव्हेंबरला चव्हाण सेंटरचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे .
- चव्हाण सेंटरकडून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी महाविद्यालयीन क्षेत्रात इतिहास अध्यापनाचे कार्य केले.
- इतिहास विषयाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांची 20 पुस्तके त्यांनी लिहिली आणि ती सर्व महाराष्ट्रभर लोकप्रिय झाली अनेक संदर्भग्रंथ अभ्यासून अत्यंत सोप्या शैलीत इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी या पुस्तकांमध्ये केली असल्यामुळे ती क्रमिक पुस्तके न राहता इतिहास प्रेमींची संदर्भ पुस्तके झाली आहेत.
‘पीएच.डी.’ धारकांसाठी सर्वोत्कृष्ट प्रबंध पुरस्काराची घोषणा
- देशभरातील गुणवत्तापूर्ण पीएच.डी. संशोधनाला चालना आणि तरुण संशोधकांकडून होणाऱ्या उच्च दर्जाच्या संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘पीएच.डी. सर्वोत्कृष्ट प्रबंध’ असा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.
- या अंतर्गत दरवर्षी विविध शाखांमधील पीएच.डी. प्रबंधांची पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे.
- या पुरस्कारासाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या कालावधीतील प्रबंध विचारात घेतले जाणार आहेत.
- गुणवत्तापूर्ण पीएच.डी. संशोधकांची दखल घेणे हा पुरस्काराचा उद्देश आहे.
- संशोधनाचा अत्युच्च दर्जा, ज्ञान आणि संशोधन पद्धती, स्पष्टता, परिणाम आणि परिणामकारक सादरीकरण, हे घटक विचारात घेतले जाणार आहेत. पुरस्कार निवडींसाठीची प्रक्रिया दोन टप्यात होणार आहे.
- त्यासाठी विद्यापीठ स्तरावर आणि आयोगाच्या स्तरावर निवड समिती असणार आहे.
भारतातील 56 व्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा
- देशातील 56 वा व्याघ्र प्रकल्प म्हणून छत्तीसगडमधील गुरु घासीदास-तमोर-पिंगळा व्याघ्र प्रकल्पासाठी अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भारतातील तिसरा सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प
- अधिसूचनेनुसार, गुरु घासीदास- तमोर पिंगळा व्याघ्र प्रकल्प 387 चौरस किमी क्षेत्रफळावर पसरला जाईल, ज्यात 2049.232 चौरस किमी कोर क्षेत्राचा समावेश आहे, कोरिया, सूरजपूर, बलरामपूर आणि मनेंद्रगड-चिरमिरी-भरतपूर जिल्ह्यांमध्ये.
- गुरु घासीदास- तमोर पिंगळा व्याघ्र प्रकल्प हे देशातील तिसरे मोठे व्याघ्र प्रकल्प असेल.
- नागार्जुनसागर श्रीशैलम वाघ आंध्र प्रदेशातील राखीव क्षेत्र हे देशातील सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प आहे( 3296.31 चौ.कि.मी. )त्यानंतर आसामच्या मानस व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र (2837.1) चौ.कि.मी.
- भारतातील 55 वा व्याघ्र प्रकल्प राजस्थानमधील धोलपूर – कैरोली व्याघ्र प्रकल्प आहे.
- भारतात व्याघ्र प्रकल्प 1973 पासून सुरू झाले आहे.
- भारताचे पर्यावरण मंत्री हे भूपेंद्र यादव आहेत
इस्रो–ऑस्ट्रेलियाच्या अंतराळ संस्थेत करार
- अंतराळ कार्यक्रम सहकार्य मजबूत करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी (एएसए) यांच्यात अंमलबजावणी करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
- या करारानुसार गगनयान मोहिमेसाठी दोनही अंतराळ संस्थेमध्ये सहकार्य होणार आहे.
- 20 नोव्हेंबर रोजी बंगळूरु येथे इस्रोच्या वतीने ह्यूमन स्पेस फ्लाइट सेंटरचे संचालक डी. के. सिंग आणि कॅनबेरा येथील एएसएच्या वतीने महाव्यवस्थापक जारोड पॉवेल यांनी करारावर स्वाक्षरी केली.
हमारा संविधान, हमारा सम्मान अभियान
- 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारलेली आणि 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आलेली भारतीय राज्यघटना भारताच्या लोकशाही, धर्मनिरपेक्ष आणि समतावादी चौकटीची व्याख्या करणारा मूलभूत दस्तऐवज आहे.
- गेल्या सात दशकांमध्ये, संविधानाने देशाला राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे, तसेच न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही भारताच्या शासनाची मुख्य तत्त्वे सुनिश्चित केली आहेत.
- दरवर्षी संविधान दिनी ही मूल्ये साजरी केली जातात.
भारताच्या घटनात्मक भावनेचा उत्सव
- भारतीय संविधान स्वीकारल्या प्रीत्यर्थ दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन किंवा संविधान दिवस साजरा केला जातो.
- नागरिकांमध्ये घटनात्मक मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने 19 नोव्हेंबर 2015 रोजी घोषित केले की केंद्र सरकार दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करेल.
- राष्ट्राला मार्गदर्शन करणाऱ्या लोकशाही तत्त्वांचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
- घटनात्मक मूल्यांप्रति जागरूकता निर्माण करण्याच्या या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, हमारा संविधान, हमारा सम्मान अभियान सुरू करण्यात आले आहे.
“हमारा संविधान, हमारा सम्मान ” अभियान
- 24 जानेवारी 2024 रोजी उपराष्ट्रपतींनी नवी दिल्लीतील डॉ. बी.आर. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे “हमारा संविधान, हमारा सम्मान ” अभियान सुरु केले ज्याचा उद्देश संविधानाविषयी नागरिकांची समज वाढवणे हा आहे.
- वर्षभर चालणाऱ्या या अभियानात भारतीय समाजाला आकार देण्यात राज्यघटनेच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करणे आणि नागरिकांना त्यांच्या कायदेशीर अधिकारांबद्दल शिक्षित करणे, याची खात्री करणे आहे.
- जेणेकरून ही मूलभूत तत्त्वे प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रतिध्वनित होत राहतील.
प्रादेशिक कार्यक्रम आणि जनजागृती उपक्रम
- “हमारा संविधान, हमारा सन्मान”या वर्षभर चालणाऱ्या मोहिमेची सुरुवात मार्च 2024 मध्ये बिकानेर येथील पहिल्या प्रादेशिक कार्यक्रमाने झाली.
- या कार्यक्रमाचे उद्घाटन सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांच्या हस्ते झाले होते.
डिजिटल प्रतिबद्धता आणि नागरिकांचा सहभाग
- “हमारा संविधान, हमारा सन्मान” मोहिमेचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे त्यातील डिजिटल प्रतिबद्धता.
- शिक्षण, लोकसहभाग आणि कृतीसाठी ऑनलाइन व्यासपीठ म्हणून काम करणाऱ्या समर्पित अशा या पोर्टलद्वारे नागरिकांना सक्रियपणे या मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
- या पोर्टलद्वारे, नागरिक त्यांच्या राज्यघटनेच्या ज्ञानाची चाचणी घेण्यासाठी व्हिडिओ, लेख, इन्फोग्राफिक्स आणि प्रश्नमंजुषा यासारख्या संसाधनांपर्यंत पोहोचू शकतात.
- हे नागरिकांना प्रतिज्ञा घेण्यास आणि भारताचे भविष्य घडविण्यामध्ये राज्यघटनेच्या भूमिकेबद्दल ऑनलाइन चर्चेत सहभागी होण्यास अनुमती देते.
2047 पर्यंत भारताच्या सुनिश्चित केलेल्या उद्दिष्टांना साकार करण्यात मोहिमेची भूमिका
- प्रजासत्ताक भारताच्या 75 व्या वर्षाचा एक भाग म्हणून, “हमारा संविधान, हमारा सन्मान” ही मोहीम 2047 पर्यंत विकसित भारत या उद्दिष्टांना समर्थन देते.
- ही मोहीम नागरिकांना राष्ट्राच्या भविष्याला आकार देणारी राजकीय प्रक्रिया,संविधानिक मूल्ये जपण्यासाठी, लोकशाही तत्त्वांचा आदर करण्यासाठी राजनैतिक आणि कायदेशीररीत्या कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करते.



