Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला यांचे निधन

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला यांचे निधन

जागतिक ध्यान दिन 

  • WorldMeditationDay | संयुक्त राष्ट्रांनी 21 डिसेंबरला पहिला जागतिक ध्यान दिन साजरा केला, “जागतिक शांतता आणि सौहार्दासाठी ध्यानया संकल्पनेवर भर दिला. या उपक्रमात मानसिक आरोग्य आणि जागतिक कल्याणाच्या महत्त्वावर जोर देण्यात आला आहे.
  • 21 डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा केला जावा हा लिकटेंस्टिन या देशाने मांडलेला व भारतासह अनेक देशांनी अनुमोदन दिलेला प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने एकमताने मंजूर केला
  • निश्चित ध्येय ठरवून त्या ध्येयाप्रती आपल्या मनाच्या शक्तीला एकाग्र करणे आणि उर्जा प्राप्त करण्यासाठी सरव करत राहण्याच्या प्रक्रियेस अनेक लोक ध्यान असे संबोधतात.
  •  ज्यामध्ये मानसिक आणि शारीरिक तंत्रांचा वापर करून आपले मन केंद्रित करणे किंवा स्वच्छ करणे समाविष्ट आहे
  • ध्यानामध्ये माइंडफुलनेस, केंद्रित श्वासोच्छ्वास आणि एकाग्र विचार यासारख्या तंत्रांचा वापर केला जातो. हे व्यक्तींना मानसिक स्पष्टता, भावनिक शांतता आणि शारीरिक विश्रांती मिळविण्यात मदत करते

ध्यान म्हणजे काय?

  • ध्यान ही एक प्राचीन प्रथा आहे ज्यामध्ये आपले लक्ष केंद्रित करणे आणि आपले मन शांत करणे समाविष्ट आहे. अनेक भिन्न ध्यान तंत्रे आहेत, परंतु त्या सर्वांमध्ये शांतता आणि आंतरिक शांतीची स्थिती प्राप्त करण्याचे ध्येय सामायिक आहे.
  • लोक अनेक कारणांसाठी ध्यान करतात, यासह:
  • तणाव आणि चिंता कमी करणे
  • फोकस आणि एकाग्रता सुधारणे
  • मूड आणि कल्याण वाढवणे
  • चांगली झोप प्रोत्साहन

आभासी चलन गुंतवणूकित दिल्ली अव्वलस्थानी

  • क्रिप्टो म्हणजेच आभासी चलन गुंतवणुकीत दिल्लीने पहिला क्रमांक पटकावला
  • महाराष्ट्रातील मुंबईने तिसरा तर  पुण्याने देशात  पाचवा क्रमांक पटकाविला आहे
  • देशातील प्रमुख 10 शहरांमध्ये सर्वाधिक परतावा मिळणारे आभासी चलन गुंतवणूकदारही पुण्यातीलच असल्याचेकॉइनस्विचया आभासी चलन मंचाच्या अहवालातून समोर आले आहे.
  • कॉइनस्विचनेइंडियाज क्रिप्टो पोर्टफोलिओ २०२४ : हाऊ इंडिया इन्व्हेस्ट्सहा अहवाल जाहीर केला आहे
  • देशातील वैविध्यपूर्ण आभासी चलन परिसंस्था आणि डिजिटल मालमत्तेत वाढत असलेला सहभाग यावर अहवालातून सहभाग टाकण्यात आला.
  • गुंतवणूकदारांमधील 76 टक्के पुरुष आणि 24 टक्के महिला आहेत.
  • देशातील क्रिप्टो गुंतवणुकीत दिल्ली पहिल्या , बेंगळुरू दुसऱ्या ,मुंबई तिसऱ्या, हैदराबाद चौथ्या तर पुणे पाचव्या स्थानावर आहे.
  • दिल्ली, बंगळुरू, मुंबईया शहरांचा क्रिप्टो गुंतवणुकीत वाटा अनुक्रमे 20.1% ,9.6% आणि 6.5% आहे.

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला यांचे निधन

  • राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला यांचे  वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले.
  • ते पाच वेळा हरियाणाचे मुख्यंमत्रीपद भूषविणारे आणि माजी पंतप्रधान देवीलाल चौताला यांचे पुत्र होते.यांच्या निधनावर दुःख व्यक्त कल.
  • १ जानेवारी १९३५ रोजी जन्मलेले ओम प्रकाश चौतालाहे माजी उपपंतप्रधान चौधरी देवी लाल यांच्या पाच मुलांपैकी सर्वात मोठे होते.
  • चौताला यांनी प्राथमिक शिक्षणानंतर शिक्षण सोडले होते
  • २०१३ मध्ये शिक्षक भरती घोटाळ्यात तुरुंगात असताना त्यांनी १०वी आणि १२वीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. २०२१ मध्ये त्यांची तुरुंगातून सुटका झाली होती.
  • चौताला हे पाच वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते.
  • १९८९ मध्ये जनता दल सरकारमध्ये देवी लाल उपपंतप्रधान असताना चौताला मुख्यमंत्री झाले.
  • ते सहा वेळा आमदार होते आणि १९७० मध्ये चौताला घराण्याचा बालेकिल्लामानल्या जाणाऱ्या सिरसातील एलेनाबादमधून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. नरवाना, उचाना, दरबा कलान आणि रोडी येथूनही त्यांनी निवडणूक जिंकली होती.

पर्यटन उद्योगासाठी अनुकूल असणाऱ्या देशात भारताचा 38 वा क्रमांक

  • जागतिक आर्थिक मंचाने (डब्ल्यूईएफ) नुकताच पर्यटन उद्योगासाठी अनुकूल देशांचा एक निर्देशांक प्रकाशित केला
  • एकूण 119 देशांतील पर्यटन उद्योगाचा यासाठी आढावा घेण्यात आला. त्यामध्ये भारताचा क्रमांक पर्यटनासाठी अनुकूल देशांमध्ये 38 वा आला आहे.
  • यापूर्वी पर्यटन उद्योगाचा आढावा डब्ल्यूईएफकडून 2021मध्ये घेण्यात आला होता. त्यावेळी पर्यटन उद्योगासाठी अनुकूल देशांमध्ये भारताचा क्रमांक 54 वा आला होता.
  • मात्र  त्यानंतर डब्ल्यूईएफने यासाठीचे काही निकष बदलले आणि त्यामुळे भारताचा क्रमांक 38 वा आला.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *