Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

43 वर्षांनंतर भारतीय पंप्रधानांचा कुवेत दौरा

43 वर्षांनंतर भारतीय पंप्रधानांचा कुवेत दौरा

राष्ट्रीय गणित दिन

  • भारत सरकारने 2012 मध्ये 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून घोषित केला
  • श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर, 1887 रोजी झाला होता
  • श्रीनिवास रामानुजन यांनी गणित विश्लेषण, संख्या सिद्धांत, अनंत मालिका आणि सतत अपूर्णांक यामध्ये भरीव योगदान दिले
  • राष्ट्रीय गणित दिनानिमित्त प्रयागराज येथे कार्यशाळा आयोजित केली जाते
  • या कार्यशाळेत देशभरातील विद्वान गणित आणि श्रीनिवास रामानुजन यांच्या गणितातील योगदानावर चर्चा करतात
  • भारतातील सर्व राज्ये वेगवेगळ्या प्रकारे राष्ट्रीय गणित दिन साजरा करतात.
  • या वर्षी राष्ट्रीय गणित दिन 2024 ची थीमगणित: नवीनता आणि प्रगतीचा पूलआहे.

 देशाच्या वनक्षेत्रात 25% वाढ

  • भारताच्या एकूण वनक्षेत्र आणि वृक्षक्षेत्रामध्ये वाढ झाली असल्याचे केंद्र सरकारच्या पाहणी अहवालामध्ये आढळून आले.
  • देशातील जंगल आणि झाडांखालील क्षेत्र 2021च्या तुलनेत 2023मध्ये 1,445 चौरस किलोमीटरने वाढले असल्याचे भारत वन स्थिती अहवाल (आयएसएफआर) 2023, यामध्ये नमूद करण्यात आले आहे. त्याच वेळी पश्चिम घाट आणि पूर्व घाटातील एकूण वनक्षेत्रामध्ये 58.22 चौरस किलोमीटर घट झाली आहे.
  • या अहवालानुसार देशाचे वनक्षेत्र आणि वृक्षक्षेत्र 2021 पासून 2023 पर्यंत 25.17 टक्क्यांनी वाढले आहे.
  • 2021मध्ये भारताचे एकूण वनक्षेत्र 7 लाख 13 हजार 789 किलोमीटर होते . ते आता 2023 मध्ये  7 लाख 15 हजार 343 चौरस किलोमीटर इतके झाले
  • हे क्षेत्रफळ भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 21.76 टक्के इतके आहे असे अहवालात लिहिले आहे
  • या कालावधीत भारतातील वृक्षाखालील क्षेत्र 1,289 चौरस किलोमीटरने तर वनक्षेत्र 156 चौरस किलोमीटरने वाढले
  • यामध्ये बांबूखालील क्षेत्राचाही समावेश करण्यात आल्याची माहिती भारतीय वन सर्वेक्षणाचे महासंचालक अनूप सिंह यांनी दिली.
  • वनक्षेत्र वाढण्याबरोबरच कार्बन शोषून घेण्याची क्षमता (कार्बन सिक) वाढवण्यातही यश मिळाले आहे
  • 2005 च्या तुलनेत 2023 मध्ये भारतातील 2.25 अब्ज टन कार्बन अधिक शोषला गेला आहे.
  • पॅरिस करारातून  आखून दिलेली ध्येय साध्य करण्यासाठीराष्ट्रीय निर्धारित योगदानांचा (एनडीसी) भाग म्हणून भारताने वन आणि वृक्षक्षेत्र वाढवून 2030 पर्यंत कार्बन सिंक 2.5 ते 3 अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्यासाठी कटिबद्धता दर्शवली आहे.
  • याच वेळी 2021च्या कार्बनच्या साठ्याच्या तुलनेत 2023मध्ये 81.5 टक्के वाढ झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे
  • कार्बन साठा म्हणजे जमीन, झाडांची मुळे आणि जमिनीवरील जीववस्तुमानात (बायोमास) साठवलेले कार्बनचे प्रमाण.
  • छत्तीसगड, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि राजस्थानमध्ये सर्वाधिक वन आणि वृक्षक्षेत्र वाढले आहे.

 98 व्या साहित्य संमेलनाचे उदघाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार

  • दिल्ली येथे आयोजित 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
  • या संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी संमेलनाच्या उद्घाटनासाठी मोदींना निमंत्रित केले होते. ते निमंत्रण मोदींनी स्वीकारले आहे.
  • 21 फेब्रुवारी 2025 रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उदघाटन होईल.
  • संमेलनाचे अध्यक्ष: तारा भवाळकर
  • स्वागताध्यक्ष : शरद पवार
  • उदघाटक : नरेंद्र मोदी
  • साहित्य महामंडळाचे अध्यक्ष: उषा तांबे

43 वर्षांनंतर भारतीय पंप्रधानांचा कुवेत दौरा

  • महाभारत आणि रामायणाचे अरबीमध्ये भाषांतर तसेच प्रकाशन करणाऱ्या कुवेतमधील दोन नागरिकांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. दोन्ही ग्रंथांच्या अरबी आवृत्त्यांच्या प्रतींवरही पंतप्रधानांनी स्वाक्षरी केली
  • कुवेतचे श्रीमंत शेख मेशाल अलअहमद अलजाबेर अलसबाह यांच्या निमंत्रणावरून मोदी कुवेतला पोहोचले होते. त्यांचा हा दौरा दोन दिवसांचा आहे.
  • 43 वर्षांत भारतीय पंतप्रधानांची आखाती देशाची ही पहिलीच भेट आहे. यापूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1981 मध्ये कुवेतला भेट दिली होती.

महाराष्ट्राचे नवे  मंत्रिमंडळ

1) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : गृह, ऊर्जा (अपारंपारिक ऊर्जा वगळून), न्याय विधी, सामान्य प्रशासन, माहिती प्रसारण खातेवाटप झालेली सर्व खाती.

2) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे : नगरविकास, गृहनिर्माण

3) उपमुख्यमंत्री अजित पवार: अर्थ आणि नियोजन, उत्पादन शुल्क

कॅबिनेट मंत्री (एकूण 33)

1) चंद्रशेखर बावनकुळे : महसूल

2) राधाकृष्ण विखे :जलसंपदा (गोदावरी कृष्णा खोरे विकास)

3) हसन मुश्रीफ: वैद्यकीय शिक्षण

4) चंद्रकांत पाटील :उच्च तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री

5) गिरीश महाजन :जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन

6) गुलाबराव पाटील : पाणीपुरवठा आणि स्वच्छता

7) गणेश नाईक : वन

8) दादाजी भुसे : शालेय शिक्षण

9) संजय राठोड : जलसंधारण आणि पाणी परीक्षण

10) धनंजय मुंडे : अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

11) मंगलप्रभात लोढा : कौशल्य विकास, रोजगार, उद्योग संशोधन

12) उदय सामंत : उद्योग मराठी भाषा

13) जयकुमार रावल : विपणन, राजशिष्टाचार

14) पंकजा मुंडे : पर्यावरण हवामान बदल, पशुसंवर्धन

15) अतुल सावे : ओबीसी विकास, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा

16) अशोक उईके : आदिवासी विकास मंत्रालय

17) शंभूराज देसाई : पर्यटन, खाण स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

18) आशिष शेलार : माहिती तंत्रज्ञान

19) दत्तात्रय भरणे : क्रीडा अल्पसंख्याक विकास वक्फ मंत्रालय

20) आदिती तटकरे : महिला बालविकास

21) शिवेंद्रराजे भोसले : सार्वजनिक बांधकाम

22) माणिकराव कोकाटे : कृषी

23) जयकुमार गोरे : ग्रामविकास, पंचायत राज

24) नरहरी झिरवाळ : अन्न औषध प्रशासन

25) संजय सावकारे : वस्त्रोद्योग 

26) संजय शिरसाट : सामाजिक न्याय

27) प्रताप सरनाईक : परिवहन

28) भरत गोगावले : रोजगार हमी, फलोत्पादन

29) मकरंद पाटील : मदत पुनर्वसन

30) नितीश राणे : मत्स्य आणि बंदरे

31) आकाश फुंडकर : कामगार 

32) बाबासाहेब पाटील : सहकार

33) प्रकाश आबिटकर : सर्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण

राज्यमंत्री (एकूण 6)

34) माधुरी मिसाळ : सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास वक्फ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण आदी

35) आशिष जयस्वाल : अर्थ आणि नियोजन, विधी न्याय आदी

36) मेघना बोर्डीकर : सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा आदी

37) द्रनील नाईक : उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन आदी

38) योगेश कदम : गृह (शहर), महसूल, पंचायत राज आदी

39) पंकज भोयर : गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार आदी.

नवी मुंबईचे शिल्पकार शिरीष पटेल यांचे निधन

  • नवी मुंबईचे शिल्पकार अशी ख्याती असलेले ज्येष्ठ वास्तुरचनाकार शिरीष बी. पटेल यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले.
  • स्वातंत्र्योत्तर काळात मुंबईतील अनेक पायाभूत सुविधांद्वारे मुंबईला आकार देण्याचे श्रेय पटेल यांनाच जाते.
  • 1932 मध्ये जन्मलेल्या पटेल यांनी त्या काळात केम्ब्रिज विश्वविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले.
  • पुढे 1960 मध्ये त्यांनी मुंबईत शिरीष पटेल अँड असोसिएट (एसपीए) या कंपनीची स्थापना केली
  • या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात अनेक उल्लेखनीय कामे केली.
  • झपाट्याने विकसित होत असलेल्या महानगरांवरील ताण कमी करण्यासाठी एक नवीन शहर विकसित करायला हवे,’ असा विचार त्यांनी एका लेखाद्वारे मांडला होता.
  • 1965 मध्ये चार्ल्स कोरिया आणि प्रवीण मेहता यांच्यासमवेत हा विचार पुढे आणला होता
  • हे नवीन शहर म्हणजे आताची नवी मुंबई आहे.
  • 1970 ते 1974 दरम्यान त्यांनी शहराच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण कामे केली.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *