Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती रामसुब्रमण्यम

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती रामसुब्रमण्यम

राष्ट्रीय ग्राहक दिन

  • राष्ट्रीय ग्राहक दिन ,ग्राहकांना त्यांच्या हक्कांची आठवण करून देण्यासाठी साजरा केला जातो.
  • या दिवशी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 ला राष्ट्रपतींची संमती मिळाली होती
  • या कायद्यामुळे ग्राहकांना सदोष वस्तू, असमाधानकारक सेवा, आणि अनुचित व्यापार पद्धतींविरुद्ध संरक्षण मिळते
  • थीम : “आभासी सुनावणी आणि ग्राहक न्यायासाठी डिजिटल प्रवेश“. 
  • राष्ट्रीय ग्राहक हक्क दिनाची सुरुवात 24 डिसेंबर 1986 पासून झाली, जेव्हा भारत सरकारने ग्राहक संरक्षण कायदा लागू केला
  • या कायद्याने ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी एक मजबूत आराखडा सादर केला कारण या कायद्याने ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण केले आणि ग्राहकांना अनुचित व्यापार पद्धती, सदोष उत्पादने आणि कमतरतेच्या सेवांविरुद्ध चौकशी करण्याचे आणि आवाज उठविण्याचे सामर्थ्य दिले.
  • राष्ट्रीय ग्राहक हक्क दिनाचे महत्त्व ग्राहक हक्कांबद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या भूमिकेत आहे
  • हा दिवस ग्राहकांना त्यांच्या हक्कांबद्दल आणि व्यवसायांना नैतिक पद्धती अवलंबण्यास प्रोत्साहित करण्यासाठी जबाबदार्यांबद्दल शिक्षित करण्याचा एक मार्ग म्हणून काम करतो.
  • या दिवसाचे उद्दिष्ट एक बाजारपेठ तयार करणे आहे जिथे ग्राहकांना माहिती दिली जाते, सशक्त केले जाते आणि संरक्षित केले जाते.  
  • आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन 15 मार्च रोजी साजरा केला जातो.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती रामसुब्रमण्यम

  • सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही. रामसुब्रमण्यम यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे  नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली
  • न्यायमूर्ती (निवृत्त) अरुण कुमार मिश्रा यांचा 1 जून रोजी कार्यकाळ पूर्ण झाल्यापासून राष्ट्रीय मानवाधिक आयोग अध्यक्षपद रिक्त होते
  • व्ही. रामसुब्रमण्यम हे जून 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदावरून निवृत्त झाले होते.
  • भारताचे माजी सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश निवड समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींद्वारे मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले जातात.
  • प्रियांक कानुंगो आणि न्यायमूर्ती (निवृत्त) विद्युत रंजन सारंगी यांची आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

रामसुब्रमण्यम यांच्याविषयी

  • रामसुब्रमण्यम यांचा जन्म तमिळनाडूतील मन्नारगुडी येथे झाला.
  • ते सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत
  • ते हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीशही राहिले आहेत
  • याव्यतिरिक्त, ते मद्रास उच्च न्यायालय आणि तेलंगणा उच्च न्यायालयात न्यायाधीश राहिले आहेत
  • रामसुब्रमण्यम 29 जून 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले
  • सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना त्यांनी 102 निवाडे लिहिले
  • 2016 च्या नोटाबंदी धोरण आणि लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये परिस्थितीजन्य पुराव्याची वैधता यावर सुनावणी करणाऱ्या खंडपीठांचे ते सदस्य होते.

निवड  कशी केली जाते?

  • निवड समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय मानवाधिकार  अध्यक्षाची  नियुक्ती राष्ट्रपती करतात.
  • या निवड समितीचे अध्यक्ष पंतप्रधान असतात, तर लोकसभेचे अध्यक्ष, गृहमंत्री, लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्यसभेचे उपाध्यक्षही सदस्य असतात.
  • न्यायमूर्ती मिश्रा यांच्या निवृत्तीनंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे  सदस्या विजया भारती यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोग

  • भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC ) ही 28 सप्टेंबर 1993 च्या मानवी हक्क संरक्षण अध्यादेशाअंतर्गत 12 ऑक्टोबर 1993 रोजी स्थापन करण्यात आलेली एक वैधानिक संस्था आहे.
  • या आयोगात एक अध्यक्ष, चार पूर्णवेळ सदस्य आणि चार मानित सदस्य असतात

कार्य:

  • मानवी हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन करणे
  • भारतीय नागरिकांसाठी न्याय्य आणि धार्मिक वातावरण निर्माण करणे
  • केंद्र आणि राज्य स्तरावरील सरकारमध्ये मानवाधिकारांच्या दृष्टिकोनावर आधारित काम करणे
  • बोधवाक्य : सर्वे भवन्तु सुखिनः( ”सर्व सुखी होवो” )
  • मुख्यालय: नवी दिल्ली

प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते श्याम बेनेगल यांचे निधन

  • समांतर चित्रपट जगणारे आणि जगवणारे प्रख्यात दिग्दर्शक, निर्माते श्याम बेनेगल यांचे 90 व्या वर्षी निधन झाले.
  • परिवर्तनवादी दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे श्याम बेनेगल यांनी सामाजिक आशयप्रधान चित्रपटांद्वारे भारतीय चित्रपटसृष्टीवर अमीट ठसा उमटवला
  • गेल्या काही वर्षांपासून ते किडनीच्या विकाराने त्रस्त होते.
  • 14 डिसेंबर 1934 रोजी हैदराबाद येथे जन्मलेले श्याम बेनेगल यांनी आपल्या चित्रपटांत समाजातील वास्तववादी विषय हाताळले
  • अंकुर‘, ‘निशांत‘, ‘मंथन‘, ‘भूमिका‘, ‘जुनूनयांच्यासह अनेक वास्तववादी चित्रपट त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला दिले.
  • अंकुरमुळे हिंदी चित्रपटसृष्टीला शबाना आझमी नावाची अभिनेत्री मिळाली
  • अंकुरया त्यांच्या पहिल्यावहिल्या चित्रपटाला. राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते; तसेचनिशांत‘, ‘मंथन‘, ‘जुनून‘, ‘आरोहणया चित्रपटांनीही राष्ट्रीय पुरस्कार पटकावले.
  • सरदारी बेगम‘, ‘झुबैदा‘, ‘नेताजी सुभाषचंद्र बोस : फरगॉटन हिरोआणिवेल डन अब्बाहे त्यांचे चित्रपटही प्रेक्षकांमध्ये चर्चेत राहिले.
  • अनंत नाग, नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, शबाना आझमी, स्मिता पाटील यांच्यासह अनेक कलाकार बेनेगल यांनी घडवले.
  • चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी बेनेगल यांना 1976 मध्ये पद्मश्री, 1991मध्ये पद्मभूषण आणि 2005 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *