- संरक्षणमंत्रालयाने नवे वर्ष सुधारणांचे वर्ष म्हणून जाहीर केले आहे.
- सायबरअन् अवकाश युद्ध, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग, रोबोटिक्स, हायपरसोनिक टेक्नोलॉजी यांसारख्या नव्या क्षेत्रांवर तसेच वेगाने विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानावर नव्या वर्षात लक्ष केंद्रित केले जाईल.
- लष्कराचेआधुनिकीकरण, लष्करी क्षमतेचा विकास आणि अधिग्रहण प्रक्रियेत सुलभता आणण्यासह इतर मुद्द्यांवर संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
- तांत्रिकदृष्ट्याप्रगत, प्रत्येक प्रकारचे आणि स्तरावरचे युद्ध हाताळण्याची क्षमता असलेले सैन्यबळ तयार करण्याचे लष्कराचे उद्दिष्ट आहे.
- संरक्षणक्षेत्राची निर्यात वाढविण्याचा प्रयत्न मागील काही वर्षांपासून सुरू आहे.
- दशकभरापूर्वीदोन हजार कोटी रुपयांवर असलेली भारताची संरक्षण निर्यात आता 21 हजार कोटी रुपयांवर गेली आहे.
- वर्ष2029 पर्यंत निर्यातीचा आकडा 50 हजार कोटी रुपयांवर नेण्याचे लक्ष्य आहे.
आर. वैशाली कांस्य पदकाची मानकरी
- कोनेरूहम्पीनंतर भारताच्या आर. वैशालीने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत देदीप्यमान कामगिरी केली आहे.
- कोनेरूहम्पीने जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेतील महिला विभागात विजेता होण्याचा मान संपादन केला.
- आर. वैशालीहिने जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेमधील महिला विभागात कांस्यपदकावर नाव कोरले.
- महिलाविभागात आर. वैशालीने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत चीनच्या झी जिनर हिच्यावर २.५-१.५ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला, मात्र अंतिम चार फेरीमध्ये तिला चीनच्याच झू वेनजुन हिच्याकडून २.५-०.५ अशी हार पत्करावी लागली.
- महिलाविभागात चीनच्या खेळाडूंचेच वर्चस्व प्रकर्षाने दिसून आले.
- अंतिमफेरीत पोहोचलेल्या दोन्ही खेळाडू चीनच्या होत्या.
- झू वेनजुनने अंतिम फेरीच्या लढतीत लेई टिंगजिए हिच्यावर ३.५-२.५ अशी मात करीत विजेतेपदावर नाव कोरले.
वनस्पतिशास्त्रज्ञ मणिलाल यांचे निधन
- प्रख्यातवनस्पतिशास्त्रज्ञ आणि पद्मश्री पुरस्कार विजेते के. एस. मणिलाल यांचे वयाच्या 86 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
- त्यांनीप्राचीन लॅटिन ग्रंथ ‘हॉर्टस मॅलाबॅरिकस’ या ग्रंथाचे इंग्रजी आणि मल्याळीमध्ये भाषांतर केले होते.
- केरळमधीलत्रिसूर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
- कत्तुंगलसुब्रह्मण्यम मणिलाल असे त्यांचे पूर्ण नाव असले तरी के. एस. मणिलाल म्हणून ते प्रसिद्ध होते.
- तेकालिकत विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्रज्ञ विभागाचे माजी प्रमुख होते.
- मणिलालयांनी अनेक पुस्तके लिहिली आणि 200 हून अधिक संशोधन लेखन प्रकाशित केले आहे.
- त्यांचा’पद्मश्री’ ने सन्मान झाला होता.
अर्नोल्ड रतेल यांचे निधन
- इस्टोनियाचेमाजी अध्यक्ष आणि सोव्हिएत इस्टोनियाचे शेवटचे कम्युनिस्ट नेते अर्नोल्ड रतेल यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले.
- रतेलहे 1977मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे नेते झाले होते.
- 1983 मध्येत्यांची इस्टोनियाच्या सर्वोच्च सभागृहाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
- रतेलयांनी त्यानंतर सातत्याने सोव्हिएत रशियातून बाहेर पडण्याची आणि संपूर्ण स्वातंत्र्यासाठी तयारी सुरू केली होती.
- 1940 मध्येसोव्हिएत रशियाने इस्टोनियावर ताबा मिळवला होता.
- 1988 मध्येरतेल यांनी स्वातंत्र्याचा जाहीरनामा तयार केला होता.
- 1991 मध्येइस्टोनिया सोव्हिएत रशियातून बाहेर पडून स्वतंत्र झाला. रतेल यांनी त्यानंतर शेतकऱ्यांना पाठिंबा जाहीर केला
देशांतर्गत प्रवासासाठी इंटरनेट उपलब्ध करून देणारी एअर इंडिया पहिली कंपनी
- विमानातूनदेशात प्रवास करताना इंटरनेट वापरणे आता शक्य होणार आहे.
- ‘एअरइंडिया’ने देशांतर्गत विमानप्रवासात वाय-फाय सुविधा देऊ केली असून, अशा प्रकारची सुविधा देणारी ही पहिली कंपनी ठरली आहे.
- ‘एअरइंडिया’ने एअरबस ए 350 आणि बोइंग 787-9 या रुंद विमानांमध्ये वाय-फायची सुविधा देऊ केली आहे.
- देशांतर्गतआणि आंतरराष्ट्रीय विमानांसाठी ही सुविधा देण्यात येणार आहे.
- याखेरीज, एअरबसए 321 निओ प्रकारच्या निवडक विमानातूनही ही सुविधा प्रवाशांना दिली जाईल.
इथे मिळणार वाय–फाय..
- ‘एअरइंडिया’च्या विमान उड्डाणादरम्यान दहा हजार फुटांच्या वर गेल्यानंतर वाय-फाय सुविधा मिळू लागेल.
- आयओएसआणि अँड्रॉइड प्रणाली असलेल्या लॅपटॉप, टॅबलेट व स्मार्टफोन यांच्यासाठी ही सुविधा विमानात वापरता येईल. त्याचप्रमाणे ही सुविधा एकाच वेळी अनेक उपकरणांसाठीही वापरता येणार आहे.