Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

‘नो युवर आर्मी’ प्रदर्शनाचे उदघाटन

'नो युवर आर्मी' प्रदर्शनाचे उदघाटन

साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वारास वीर सावरकर यांचे नाव

  • फेब्रुवारीमध्ये(2025) दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ, प्रवेशद्वार किंवा व्यासपीठाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी अनेक सावरकरप्रेमींनी साहित्य महामंडळ व आयोजकांकडे केली होती.
  • यामागणीची अखेर दखल घेण्यात आली असून संमेलनाच्या एका प्रवेशद्वाराला सावरकरांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • 21 ते23 फेब्रुवारीदरम्यान दिल्लीत होणाऱ्या या संमेलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी साहित्य महामंडळ, महामंडळाच्या घटक संस्था व सरहद या आयोजक संस्थेची संयुक्त बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती.
  • याबैठकीत मुख्य प्रवेशद्वाराला लोकमान्य टिळकांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला तर ‘व्हीआयपी’ प्रवेशव्दारास वीर सावरकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला.

नो युवर आर्मीप्रदर्शनाचे उदघाटन

  • आकाशातघोंघावणारे ड्रोन, मल्लखांबावर चित्तथरारक कसरती, रोबोटिक म्यूल आणि लष्कराचे प्रशिक्षित श्वान, कलरीपयङ्क-मार्शल आर्ट्सच्या लक्षवेधक सादरीकरणाला मिळालेली दाद… हेलिकॉप्टरनी दिलेली सलामी… बंदुका, रणगाडे, क्षेपणास्त्र प्रक्षेपक अशी लष्करी सामग्री पाहण्यासाठी झालेली गर्दी… अशा वातावरणात पुणे येथे ‘नो युवर आर्मी’ हे प्रदर्शन सुरू झाले.
  • भारतीयलष्कराचा ‘आर्मी डे परेड’ कार्यक्रम 15 जानेवारी रोजी होणार आहे. या निमित्ताने लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब अर्थात रेसकोर्स येथे आयोजित  ‘नो युअर आर्मी’ या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमोव्हायरसचे रुग्ण आढळले

  • ह्युमनमेटापन्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) या नव्या आजाराने डोके वर काढले असून अनेकांना या आजाराची लागण झाले आहे.
  • चीनमध्येएचएमपीव्ही आजाराचा उद्रेक झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
  • याआजारामध्ये विषाणू श्वसन यंत्रणेमध्ये बाधा आणतो. ज्यामुळे सामान्य सर्दी होते आणि फ्लूसारखी लक्षणे दिसू शकतात. मात्र चीनने देशात फ्लूचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याच्या अहवालांना नकार दिला.

ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस

  • ह्युमनमेटापन्यूमोव्हायरस ( HMPV) हा न्यूमोव्हिरिडे कुटुंबातील एकल-असलेला आरएनए विषाणू आहे आणि तो एव्हियन मेटापन्यूमोव्हायरस (AMPV) उपसमूह C शी जवळचा संबंध आहे.
  • 2001 मध्येनेदरलँडमध्ये बर्नाडेट जी. व्हॅन डेन हूजेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मानवी मेटापन्यूमोव्हायरसचा शोध लावला.
  • एचएमपीव्हीप्रथम नेदरलँड्समधील 28 लहान मुलांच्या श्वसन स्रावांमध्ये आढळून आले आणि सुरुवातीला ते इतर सामान्य श्वसन विषाणूंपासून वेगळे होते कारण चाचणी पद्धती व्हॅन डेन हूजेन एट अल. (व्हायरस-विशिष्ट अँटीबॉडीज वापरून इम्यूनोलॉजिकल ॲसेस आणि व्हायरस जीनोम-विशिष्ट प्राइमर्स वापरून पीसीआर-आधारित पद्धती) वापरण्याचा प्रयत्न केला होता, केवळ ज्ञात श्वसन विषाणूंची चाचणी घेण्यात सक्षम होते आणि म्हणूनच, नवीन विषाणू ओळखण्यात अक्षम होते.
  • संशोधकांनीआण्विक जीवशास्त्र तंत्रांचा अवलंब करण्यास सुरुवात केली नाही तोपर्यंत विषाणूच्या जीनोमिक अनुक्रमांचे अनुवांशिक वैशिष्ट्ये आणि भाग ओळखले जाऊ शकतात; या तंत्रांमध्ये यादृच्छिकपणे प्राइम केलेले पीसीआर तंत्र समाविष्ट होते ज्याने हा नवीन विषाणू आणि एव्हीयन न्यूमोव्हायरस यांच्यातील स्पष्ट संबंध प्रकट करण्यासाठी आवश्यक मर्यादित अनुक्रम डेटा प्राप्त केला.
  • एएमपीव्हीशीअसलेल्या या घनिष्ट संबंधामुळेच या नवीन विषाणूला ह्यूमन मेटाप्युमोव्हायरस असे नाव देण्यात आले .

एचएमपीव्हीचे स्वरूप

  • श्वसनाशीसंबंधित विषाणू आहे
  • वरच्याआणि खालच्या श्वसनमार्गाचे आजार उ‌द्भवू शकतात
  • अमेरिकेच्या’सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रीव्हेंशन’ (सीडीसी) या सार्वजनिक आरोग्य संघटनेनुसार सर्व वयोगटातील व्यक्तींना याचा संसर्ग होऊ शकतो. विशेषतः लहान मुले, वृद्धांसह ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली आहे, अशा व्यक्तींना त्याची लागण लवकर होते
  • हानवा विषाणू नाही. नेदरलँडमध्ये 2001 मध्ये तो प्रथम आढळला
  • कंबोडियात2007 आणि 2009 मध्ये मुलांमध्ये याचा संसर्ग

एचएमपीव्हीची प्रमुख लक्षणे

  • फ्लूआणि श्वसनाच्या इतर संसर्गाप्रमाणेच लक्षणे
  • खोकला, ताप, नाकबंद होणे आणि श्वास घ्यायला त्रास होणे, अशी सामान्य लक्षणे
  • गंभीरस्थितीमध्ये या विषाणूमुळे ब्राँकायटिस किंवा न्यूमोनियासारखे आजार उद्भवू शकतात
  • संसर्गानंतरतीन ते सहा दिवसांनी याची लक्षणे दिसतात
  • संसर्गाच्याप्रमाणानुसार आजाराचा कालावधी वेगवेगळा असू शकतो

 एकदिवसीय लेखिका संमेलन

  • जगद्‌गुरूतुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने सावित्री जिजाऊ महोत्सवांतर्गत 5 जानेवारीला वाशीम जिल्ह्यातील धामणी मानोरा येथे एक दिवसीय लेखिका संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • संमेलनाच्याअध्यक्षस्थानी नागपूरच्या लेखिका डॉ. लीना निकम असतील.

चार्ल्स दी गॉलभारतात आगमन

  • फ्रान्सचेअण्वस्त्रक्षम विमानवाहू जहाज ‘चार्ल्स दी गॉल’ आणि या जहाजाचा संपूर्ण ताफा 4 जानेवारीला गोवा आणि कोची किनाऱ्याला भेट देणार आहे.
  • भारतआणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक संबंध मजबूत होत असल्याचे हे निदर्शक मानले जात आहे.
  • ‘चार्ल्स’च्याप्रचंड मोठ्या ताफ्यात अनेक विनाशिका आणि मध्यम व छोट्या आकाराच्या जहाजांचा समावेश आहे.
  • सध्याहा ताफा हिंद महासागरात आहे.
  • चार्ल्सआंद्रे जोसेफ मरी दि गॉल (नोव्हेंबर २२, इ.स. १८९० – नोव्हेंबर ९, इ.स. १९७०) हे फ्रान्सचे सेनापती आणि राष्ट्राध्यक्ष होते.
  • दुसऱ्यामहायुद्धात फ्रान्स पराभूत झाल्यानंतर दि गॉलने मुक्त फ्रांसच्या सैन्याचे नेतृत्व केले व नंतर फ्रान्सचे पाचवे प्रजासत्ताक स्थापन केले. ते इ.स. 1959 ते इ.स. 1969पर्यंत राष्ट्राध्यक्षपदी होते.
  • त्यांच्यानावावावरूनच या अण्वस्त्रक्षम विमानवाहू जहाजाला नाव देण्यात आले.

डॉ. कुमार सप्तर्षी यांना बाबा आमटे जीवनगौरव पुरस्कार जाहीर

  • बाबाआमटे एकता अभियान ट्रस्टतर्फे ‘बाबा आमटे जीवनगौरव डॉ. कुमार सप्तर्षी पुरस्कार 2025’ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युक्रांदचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांना जाहीर झाला.
  • हापुरस्कार वितरण सोहळा 9 फेब्रुवारी रोजी कोथरूड येथील गांधी स्मारक निधी सभागृह येथे होणार आहे.
  • तसेचयावेळी ‘बाबा आमटे सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार’ ओडीशा येथील सामाजिक कार्यकर्ते   मधुसूदन दास आणि कोल्हापूर येथील हसन फत्तेखान देसाई यांना संयुक्तपणे गौरविण्यात येणार आहे.
  • ज्येष्ठविचारवंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. सप्तर्षी यांनी अनेक दशके महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कार्य केले आहे.
  • सध्याते ‘गांधी स्मारक निधी’ या संस्थेचे कार्यवाह असून ‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकाचे ते संपादक आहेत.
  • तसेचदास हे प्रसिद्ध गांधीवादी ‘एस. एन. सुब्बाराव’ यांच्या पासून प्रेरित ‘राष्ट्रीय युवा योजना’ या संघटनेचे संचालक आहेत तर देसाई हे राष्ट्र सेवा दलाचे सक्रिय कार्यकर्ते आणि समाजसेवक आहेत.

राधाकृष्ण विखे यांना डॉक्टरेट

  • वसंतरावनाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानाची पदवी देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • विद्यापीठाच्या26 व्या पदवीदान समारंभामध्ये पदवी पदान केली जाणार आहे.
  • विखेयांनी शेती, सहकार, शिक्षण या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन विद्यापीठाने त्यांना हा बहुमान दिला आहे.

गायक वेन ऑस्मंड यांचे निधन

  • सत्तरच्यादशकातील ‘वन बँड अॅपल’, ‘यो-यो’ आणि डाऊन बाय द लेझी रिव्हर’ यांसारख्या हिट गाण्यांसाठी गायक, गिटारवादक आणि ‘द ऑस्मंड्स’चे संस्थापक सदस्य वेन ऑस्मंड यांचे नुकतेच वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले.
  • गायकअँडी विल्यम्स यांच्या साथीने साठच्या दशकात वेन यांची लोकप्रियता वाढत गेली.
  • त्यांच्या’वन बॅड अॅपल’ आणि इतर गाण्यांची तुलना बऱ्याचदा ओस्मंड्सच्या समकालीन, ‘जॅक्सन फाइव्ह’च्या संगीताशी केली जात असे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *