बोराडे यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर
- मराठी साहित्य आणि वाङ्मय क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या साहित्यिकास देण्यात येणारा मानाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार (2024) ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे यांना जाहीर झाला आहे.
- पुरस्काराचे स्वरूप : दहा लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे.
- लातूर जिल्ह्यातील काटगाव येथे जन्मेलेले बोराडे यांनी आमदार सौभाग्यवती,आयुष्याच्या सायंकाळी ,इथं होतं एक गाव ,कणसं आणि कडबा,कथा एका तंटामुक्त गावाची ,चारापाणी ,पाचोळा,मळणी, बुरुज, नातीगोती इ. कथा-कादंबऱ्याचे लिखाण केले.
- विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार हा साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत ज्येष्ठ साहित्यिकास, गोविंद विनायक करंदीकर (विंदा करंदीकर) यांच्या नावे जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने 2012-13 या वर्षापासून प्रदान करण्यात येतो.
- पहिला विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आणि समीक्षक डॉ. विजया राजाध्यक्ष यांना देण्यात आला.



