Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

चंद्रिका टंडन यांना ग्रॅमी पुरस्कार

चंद्रिका टंडन यांना ग्रॅमी पुरस्कार

 

  • संगीत क्षेत्रात विशेष योगदानाबद्दल दिला जाणारा जागतिक प्रतिष्ठेचा ग्रॅमी पुरस्कार या वर्षी भारतीय-अमेरिकी गायिका आणि उद्योजिका चंद्रिका टंडन यांना ‘त्रिवेणी’ या अल्बमबद्दल जाहीर झाला.
  • 67 व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात त्यांना गौरविण्यात आले.
  • ‘बेस्ट न्यू एज’, ‘अॅबियंट किंवा चॅट’ अल्बम श्रेणीत त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
  • दक्षिण आफ्रिकेच्या बासरीवादक वॉटर केलरमन व जपानी व्हायोलिन वादक एरू मात्सुमोटो यांच्यासोबत टंडन यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • ‘रेकॉर्डिंग अकादमी’ने अमेरिकेतील लॉस एंजलीसमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
  • दक्षिण आफ्रिकेतील विनोदी कलाकार ट्रेवर नोआ यांनी सलग पाचव्यांदा या समारंभाचे आयोजन केले.
  • उद्योगक्षेत्रात नेतृत्व करणाऱ्या टंडन या ‘पेप्सिको’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नुयी यांच्या ज्येष्ठ भगिनी आहेत.
  • टंडन यांचे या पुरस्कारासाठी दुसऱ्यांदा नामांकन करण्यात आले होते.
  • यापूर्वी 2009 च्या ‘सोल कॉल’ अल्बमसाठी त्यांचे नामांकन होते, मात्र, त्यांना पुरस्कार मिळाला नव्हता.
  • यावेळेस तो प्रथमच मिळाला. गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या संगमावरून टंडन, केलरमन आणि मात्सुमोटो या तीन कलाकांरांच्या अल्बमला ‘त्रिवेणी’ हे नाव देण्यात आले.
  • हे कलाकार वैविध्यपूर्ण संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात.
  • प्रसिद्ध अमेरिकी रॅपर-हिपहॉप कलाकार केंड्रिक लामारने ‘नाट लाईक अस’ या अल्बमसाठी तब्बल पाच श्रेणींमध्ये पुरस्कार मिळविले.

 बियॉन्सेची बाजी

  • बियॉन्से ‘काऊबॉय कार्टर’ साठी अल्बम ऑफ द इयर हा सर्वांत महत्त्वाचा पुरस्कार जिंकला.
  • त्याबरोबरच सर्वोत्कृष्ट कंट्री अल्बम जिंकणारी ती पहिली कृष्णवर्णीय कलाकार ठरली.
  • या पुरस्कारासाठी बियॉन्सेला 11 नामांकने मिळाली होती.
  • केंड्रिक लामरच्या ” नॉट लाईक अस ” या गाण्याने पाचही नामांकने जिंकली, ज्यात रेकॉर्ड ऑफ द इयर आणि सॉन्ग ऑफ द इयर यांचा समावेश होता , ज्यामुळे ते ग्रॅमी पुरस्कारांच्या इतिहासातील सर्वात सजवलेले रॅप गाणे बनले.
  • 2019 मध्ये चाइल्डिश गॅम्बिनो नंतर दोन्ही पुरस्कार जिंकणारा तो दुसरा रॅप कलाकार बनला .
  • बियॉन्सेला अकरा नामांकने मिळाली आणि तिने तीन पुरस्कार जिंकले, ज्यात अल्बम ऑफ द इयर आणि काउबॉय कार्टरसाठी सर्वोत्कृष्ट कंट्री अल्बम यांचा समावेश होता.
  • ती 1999 मध्ये लॉरीन हिल नंतर सर्वोत्कृष्ट कंट्री अल्बम जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय कलाकार आणि अल्बम ऑफ द इयर जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला ठरली .

चंद्रिका टंडन:

  • चंद्रिका टंडन यांचे बालपण चेन्नईमध्ये गेले आहे. त्या तमिळ ब्राह्मण कुटुंबात जन्मल्या असून त्यांच्या आई संगीतकार तर वडील बँकर होते.
  • चंद्रिका टंडन या एक भारतीय-अमेरिकन गायिका आहे तसेच त्या एक उद्योजक आहे.
  • चंद्रिका यांचे सुरुवातीचे जीवन आणि शिक्षण भारतात झाले आहे. यानंतर त्यांनी चेन्नईमध्ये मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले.
  • त्यांना आयआयएम अहमदाबादमधून पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.
  • मॅककिन्से अँड कंपनीमध्ये भागीदार म्हणून नियुक्त झालेल्या त्या पहिल्या भारतीय-अमेरिकन महिला होत्या.
  • चंद्रिकाचे शिक्षण क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहेत.
  • न्यूयॉर्क विद्यापीठातील टंडन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या मंडळाच्या अध्यक्षा आणि एसटीईएम ( STEM) शिक्षणाच्या प्रमुख म्हणून, त्या काम करत आहे.
  • 2005 मध्ये, त्यांनी जागतिक कल्याणासाठी संगीताचा वापर करण्याचे उद्दिष्ट ठेवून, स्वतःचे नॉन प्रॉफिट म्यूजिक लेबल, सोल चैंट्स म्यूझिकची स्थापना केली होती.
  • आता ग्रॅमी पुरस्कारा हा आपल्या नावावर करून त्यांनी इतिहास रचला आहे.

ग्रॅमी पुरस्कार विजेते पहिले भारतीय:

  • पंडित रविशंकर हे ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय होते. त्यांना 1967 मध्ये ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता.
  • 2013 मध्ये त्यांना ग्रॅमी लाइफ टाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ग्रॅमी पुरस्कार

  • ग्रॅमी पुरस्कार (Grammy Award) हा अमेरिका देशामधील नॅशनल ॲकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्‌स अँड सायन्स ह्या संस्थेतर्फे दिला जाणारा एक वार्षिक पुरस्कार आहे.
  • ग्रॅमी पुरस्कार संगीतातील त्या वर्षीच्या सर्वोत्तम योगदानासाठी दिला जातो, व तो जगातील एक आघाडीचा पुरस्कार मानला जातो.
  • पहिला ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा 4 मे 1959 रोजी अमेरिकेच्या लॉस एंजेल्स व न्यू यॉर्क ह्या शहरांमध्ये साजरा झाला.
  • तेव्हापासून दरवर्षी ग्रॅमी पुरस्कार आयोजित केले जात आहेत.
  • 2004 पासून हा सोहळा लॉस एंजेल्सच्या स्टेपल्स सेंटरमध्ये भरवला जातो.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *