Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

लव्ह जिहाद विरोधी पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

लव्ह जिहाद विरोधी पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

 

  • महाराष्ट्र राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा तयार करण्याच्या हालचाली गृह विभागाने सुरू केल्या आहेत. यासाठी पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली सात जणांच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे.
  • उत्तर प्रदेश आणि गुजरात राज्याने लव्ह जिहादचा कायदा मंजूर केला आहे.
  • या कायद्यांचा अभ्यास ही समिती करणार असून राज्य सरकारला त्याबाबत शिफारस करणार आहे.
  • लव्ह जिहाद व फसवणूक करून किंवा जबरदस्तीने केलेले धर्मांतराबाबत पोलिसांकडे कशा प्रकारच्या तक्रारी येतात, याचा अभ्यास करून यावर उपाययोजना सुचविणे तसेच कायदेशीर बाबी ही समिती तपासणार आहे.
  • ज्या राज्यांनी लव्ह जिहादचा कायदा केलेला आहे त्याचा अभ्यास करून ही समिती राज्य सरकारला कायद्याच्या अनुषंगाने शिफारस करणार आहे.
  • समितीमध्ये राज्याच्या पोलिस महासंचालक, महिला व बालविकास विभागाचे सचिव, अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव, विधी व न्याय विभागाचे सचिव, सामाजिक व न्याय विशेष साहाय्य विभाग सचिव तसेच गृह विभागाच्या सचिवांचा समावेश असणार आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *