Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

भारत – अमेरिका यांच्यात महत्वापूर्ण निर्णय

भारतअमेरिका यांच्यात महत्वापूर्ण निर्णय

  • विविध क्षेत्रांत दीर्घकालीन भागीदारी करून दृढ संबंध निर्माण करण्याच्या दिशेने भारत व अमेरिकेने मोठे पाऊल टाकले.
  • अमेरिकेकडून अधिक प्रमाणात तेल, नैसर्गिक वायू आणि संरक्षण साहित्य खरेदी करण्याचा निर्णय भारताने घेतला असून, अमेरिकेनेही भारताला एफ-35 ही लढाऊ विमाने देण्याची तयारी दर्शविली आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरील चर्चेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच ही घोषणा केली.
  • भारताबरोबर संबंध चांगले असले तरी ‘जशास तसे’ आयातशुल्क लागू करणार असल्याचेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

चर्चेतील महत्वाचे मुद्दे:

  • अवकाश, ऊर्जा व नवतंत्रज्ञान विकासासाठी ‘इंडस इनोव्हेशन’ या पुढाकाराची घोषणा
  • नागरी वापरासाठीच्या अणुऊर्जेसाठी व हायड्रोकार्बन निर्मितीमध्ये सहकार्य करणार
  • तंत्रज्ञान सहकार्यासाठी ‘यूएस-इंडिया ट्रस्ट इनिशिएटिव्ह’ जाहीर
  • औद्योगिक भागीदारी वाढविण्यासाठी स्वायत्त औद्योगिक आघाडी यंत्रणा जाहीर
  • संरक्षण भागीदारीसाठी 10 वर्षांचा आराखडा निश्चित करणार
  • वर्षाअखेरीपर्यंत द्विपक्षीय व्यापार करार. 2030 पर्यंत व्यापार 500 अब्ज डॉलरपर्यंत नेणार
  • ‘एआय’ संबंधी पायाभूत विकासासाठी खासगी उद्योगांत सहकार्य वाढविणार
  • उच्च शिक्षण संस्थांमधील परस्पर सहकार्य वाढविणार

मोदींना पुस्तक भेट

  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘अवर जर्नी टुगेदर’ हे कॉफी टेबल पुस्तक भेट दिले.
  • त्यावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली असून, ‘मिस्टर प्राइम मिनिस्टर, यू आर ग्रेट,’ असे लिहिले आहे.
  • या पुस्तकात मोदी-ट्रम्प मैत्रीचे क्षण एकत्र करण्यात आले आहेत.
  • यात डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांनी सन 2020 मध्ये ताजमहालला भेट दिली तो क्षण; तसेच सन 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यूस्टनला गेले तेव्हा आयोजित करण्यात आलेला ‘हाउडी मोदी’ कार्यक्रम यांसह इतर छायाचित्रांचे संकलनदेखील आहे.

 

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *