Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

सुक्री बोम्मगौडा यांचे निधन (Sukri Bommagowda passed away)

सुक्री बोम्मगौडा यांचे निधन

 

  • माझी गाणी माझ्याबरोबर संपून जातील. तसे होऊ नये, यासाठी पूर्वजांचे संचित पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही माझी जबाबदारी आहे. ती मी जमेल तशी पार पाडते…’ सुक्री बोम्मगौडा प्रत्येक मुलाखतीत हे सांगत.
  • आपल्या पूर्वजांचे ज्ञान पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरू असलेली त्यांची धडपड आता थांबली आहे.
  • पद्मश्री सुक्री बोम्मगौडा यांचे नुकतेच वयाच्या 88 व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
  • सुक्री बोम्मगौडा यांना तब्बल हजार गाणी तोंडपाठ होती. म्हणूनच त्यांना लोकगीतांचा ‘चालता बोलता कोश’ किंवा ‘नाइटिंगेल ऑफ हलक्की’ म्हणून संबोधले जात असे.
  • त्यांची गाणी ‘कर्नाटक जनपद अकादमी’ आणि ‘ऑल इंडिया रेडिओ’च्या कारवार केंद्राने ध्वनिमुद्रित केली.
  • आजही आदिम जीवन जगणाऱ्या हलक्की वोक्कलिगांच्या इतिहास आणि परंपरांचे या गाण्यांच्या माध्यामतून कायमस्वरूपी जतन झाले आहे.
  • त्या केवळ लोककलाकार नव्हत्या. त्यांनी त्यांच्या जमातीपुरती समाजसुधारकाची भूमिकाही बजावली.
  • त्या अवघ्या 16 वर्षांच्या असताना त्यांच्या पतीचे निधन झाले. कारण होते- व्यसनाधीनता.
  • पण सुक्री बोम्मगौडा यांनी खचून न जाता आपल्या परिसरात दारूबंदी चळवळ सुरू केली.
  • दारू पिणाऱ्याला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, असा फतवाच काढला. मद्यापानाचे दुष्परिणाम समजावून सांगणारी गीते रचली, कथा सांगितल्या.
  • आपल्या भाषणांतूनही त्या यासंदर्भात जनजागृती करत. त्यातून त्यांच्या समाजातील व्यसनाधीनता बऱ्याच प्रमाणात कमी झाली.
  • सुक्री बोम्मगौडांना 1999 साली ‘जनपद पुरस्कारा’ने गौरवण्यात आले.
  • 2017 साली पद्माश्री प्रदान करण्यात आल्यानंतर त्यांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर ओळख प्राप्त झाली.
  • विविध मानसन्मानांनंतरही जुन्या, लहानशा घरात राहात. हलक्की जमातीची ओळख असलेला पोशाख आणि अनेक पदरांच्या माळा परिधान करत.

 

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *