हरित नौवहन परिषद 2025
- केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयांतर्गत असलेल्या नौवहन महासंचालनालयाने इन्स्टिटयूट ऑफ मरीन इंजिनिअर्स (भारत)- मुंबई शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत दुसऱ्या हरित नौवहन परिषद 2025 चे आयोजन केले होते.
- आंतरराष्ट्रीय डीकार्बोनायझेशन उद्दिष्टांनुरूप सागरी क्षेत्रात शाश्वतता वाढविण्याच्या भारताच्या वचनबद्धतेवर हा कार्यक्रम केंद्रित होता.
- केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आपल्या भाषणात शाश्वत सागरी पद्धतींबद्दल भारताच्या वचनबद्धता अधोरेखित केली.
- हरित सागर हरित बंदरे मार्गदर्शक तत्त्वांसह भारत ग्रीन गेटवे देखील विकसित करत आहे आणि अलंग जहाज पुनर्चक्रीकरण कार्यक्रमाच्या माध्यमातून शाश्वत जहाज पुनर्चक्रीकरणात जागतिक प्रयत्नांचे नेतृत्व करत आहे.तसेच 25,000 कोटी रुपयांचा सागरी विकास निधी हरित गुंतवणुकीला उत्प्रेरक करत असून शाश्वत जहाजबांधणी आणि सागरी पायाभूत सुविधांमध्ये भारताला अग्रणी म्हणून स्थान मिळवून देत आहे.
- सागरी वाहतुकीचे भविष्य – हरित हायड्रोजन, अमोनिया, जैवइंधन आणि एलएनजी, या स्वच्छ इंधनांमध्ये आहे.
- भारताचे राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियान शून्य-उत्सर्जन इंधनांसाठी मार्ग तयार करत असून आपली बंदरे केवळ व्यापारापुरता मर्यादित न राहता ती शाश्वत भविष्याला देखील चालना देतील याची सुनिश्चिती करत आहेत.
- ही परिषद धोरण संवाद, तांत्रिक चर्चा आणि गोलमेज बैठकांसाठी एक उच्च-प्रभावी व्यासपीठ ठरली, ज्यामध्ये उद्योग, सरकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रमुख हितधारकांचा सहभाग नोंदवला गेला.