Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

भारत – जपान संयुक्त लष्करी सराव 2025 India-Japan Joint Military Exercise

भारतजपान संयुक्त लष्करी सराव 2025

 

  • भारत आणि जपान दरम्यान 24 फेब्रुवारीपासून संयुक्त लष्करी सराव करण्यात येणार आहे.
  • ‘धर्मा गार्डियन’ या नावाने  हा सराव संयुक्त राष्ट्रांच्या निर्देशानुसार दोन देशांच्या सैन्यांमधील कार्यक्षमता आणि समन्वय वाढविण्यासाठी आयोजित केला जाणार  करण्यात येतो .
  • भारत आणि जपानची प्रादेशिक सुरक्षा शांतता आणि स्थैर्याची वचनबद्धता अधोरेखित करणारा हा सराव आहे .त्याचबरोबर मुक्त खुले आणि सर्वसमावेशक अशा इंडो पॅसिफिक दृष्टिकोनाची सहमतीही मांडणारा हा सराव आहे.
  • 24 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान, हा सराव जपानमधील ईस्ट फुजी मनोव्हर ट्रेनिंग एरिया येथे पार पडेल.
  • या सरावाची ही एकूण 6 वी आवृत्ती आहे.
  • ‘धर्मा गार्डियन’ सराव हा भारत आणि जपानमध्ये आयोजित केला जाणारा वार्षिक कार्यक्रम आहे.
  • यापूर्वीचा सराव फेब्रुवारी-मार्च 2024मध्ये राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आला होता.
  • भारतीय लष्करी दलात 120 सैनिकांचा समावेश असून, त्यात मद्रास रेजिमेंटच्या बटालियनचे सैनिक आणि इतर शस्त्र व सेवा शाखांतील कर्मचारी देखील सहभागी होतील.
  • जपान ग्राउंड सेल्फ-डिफेन्स फोर्स (JGSDF), समान सामर्थ्याच्या दलाचे 34 व्या इन्फंट्री रेजिमेंटद्वारे प्रतिनिधित्व करेल.
  • एखाद्या अन्य एका लष्करी उपक्रमाच्या तुलनेत, Dharma Guardian हा सराव- भारत आणि जपान यांच्यातील शाश्वत मैत्री, विश्वास आणि सांस्कृतिक संबंधांचे प्रतीक आहे, ज्यामुळे द्विपक्षीय लष्करी संबंध अधिक दृढ होतात आणि धोरणात्मक सहकार्याला प्रोत्साहन मिळते.
  • हा सराव पहिल्यांदा 2018 मध्ये भारतात मिझोराम येथे आयोजित करण्यात आला होता

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *