Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

महाबळेश्वरमध्ये बेडकाच्या नवीन प्रजातीचा शोधN ew species of frog discovered in Mahabaleshwar

New species of frog discovered in Mahabaleshwar

महाबळेश्वरमध्ये बेडकाच्या नवीन प्रजातीचा शोध

 

  • क्रिकेट फ्रॉग या सामान्य नावाने ओळखल्या जाणाऱ्या मीनर्वारीया या कुळात महाबळेश्वरमध्ये नव्याने शोधलेल्या बेडकाचा नुकताच समावेश करण्यात आलेला आहे.
  • नव्याने शोधलेल्या प्रजातीच्या उत्तर पश्चिमी घाटातील आढळक्षेत्रावरून तिचे नामकरण घाटी या संस्कृत आणि बोरियालिस या उत्तरेकडील क्षेत्र दर्शवणाऱ्या लॅटीन शब्दांवरून केलेले आहे.
  • मीनर्वारीया कुळातील बेडूक पोटावरील समांतर रेघांवरून इतर बेडकाहून वेगळे ठरतात.
  • साठलेल्या पाण्याशेजारी किंवा छोट्या झऱ्यांच्या शेजारी बसून रातकिड्यांसारखा आवाज काढतात म्हणून त्यांना क्रिकेट फ्रॉग या सामान्य नावाने ओळखले जाते.
  • नव्याने शोध लागलेल्या प्रजातीचे बेडूक महाबळेश्वरमधील कोळी आळीमधील एका खाजगी वाहनतळामध्ये साठलेल्या पाण्याच्या शेजारी आढळून आले.
  • आकाराने5 सेमीपेक्षा मोठे असणाऱ्या या प्रजातीचा प्रजननकाळ हा पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांपुरता मर्यादित आहे.
  • मोठा आकार, आवाजामधील वेगळेपण आणि वैशिष्ट्यपूर्ण जनुकीय संचावरून ही प्रजाती कुळातील इतर प्रजातींपासून वेगळी ठरते.
  • या संशोधनामधे मेढा येथील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. ओंकार यादव, दहिवडी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अमृत भोसले, प्राध्यापिका डॉ. प्रियांका पाटील, ठाकरे ‘वाइल्डलाइफ फाउंडेशन’चे संशोधक अक्षय खांडेकर आणि पुण्यातील भारतीय प्राणी सर्वेक्षणचे शास्त्रज्ञ डॉ. के. पी. दिनेश यांचा सहभाग आहे. या शोधासाठी तेजस ठाकरे यांचेही सहकार्य लाभले.
  • बेडकाच्या नव्या प्रजातीचा शोध झूटॅक्सा या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाला.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *