पृथ्वीराज मोहोळ ‘महाराष्ट्र केसरी‘
- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या 67 व्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत पुणे जिल्ह्याच्या पृथ्वीराज मोहोळने प्रतिष्ठेच्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचा मान मिळवला.
- अहिल्यानगर येथे पार पडलेल्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाची लढत पार पडली.
- पृथ्वीराजला एक गुण देण्याचा निर्णय न पटल्याने अखेरची 16 सेकंद राहिली असताना महेंद्रने मॅटवर परतण्यास नकार दिला. त्यामुळे पंचांनी पृथ्वीराजला विजयी घोषित केले.
- पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहळ यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पैलवान पृथ्वीराज मोहळला चांदीची गदा आणि थार गाडी देण्यात आली आहे.
- महाराष्ट्र केसरी (1961) कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य किस्तीगीर परिषद संस्थे अंतर्गत गेली सहा-सात दशकापासून राज्यातील सर्वोच्च अशा ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
पहिले विजेते:
- पैलवान दिनकर दहय़ारी (सांगली, 1961),
सर्वाधिक वेळा विजेते
- मुंबईच्या नरसिंग यादव याने 2011 ते 2013 असे सलग तीन किताब मिळवले तर 2014 ते 2016चा महाराष्ट्र केसरी जळगावचा विजय चौधरी हा आहे.