Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

आशियाई सिंह गणना मे महिन्यात होणार

आशियाई सिंह गणना मे महिन्यात होणार

 

  • मे 2025 मध्ये आशियाई सिंहांच्या 16 व्या गणनेचा अंदाज घेण्यात येणार आहे.
  • केंद्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली.
  • तसेच केंद्र सरकारने सिंहांच्या संवर्धनासाठी 2 हजार 900 कोटींहून जास्त निधी मंजूर केला आहे.
  • जागतिक वन्यजीव दिनानिमित्त राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची सातवी बैठक गुजरातमधील जुनागड येथे आयोजित करण्यात आली.
  • राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष पंतप्रधान मोदी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
  • तामिळनाडूतील कोइम्बतूर येथे मानव-वन्यजीव संघर्ष व्यवस्थापनासाठी उत्कृष्टता केंद्र ‘सॅकॉन’ची स्थापना करण्याची घोषणा केली.
  • राष्ट्रीय वन्यजीव मंडळ ही वन्यजीव संरक्षणाबाबत सरकारला सल्ला देणारी एक वैधानिक संस्था आहे.
  • यात लष्करप्रमुखासह विविध राज्यांचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, मुख्य वन्यजीव रक्षक व विविध राज्यांचे सचिव यांचा समावेश असलेले 47 सदस्य असतात.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *