Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

शस्त्रास्त्र खरेदीत युक्रेन अग्रस्थानी Ukraine leads in arms purchases

Ukraine leads in arms purchases

शस्त्रास्त्र खरेदीत युक्रेन अग्रस्थानी

 

  • स्टॉकहोम येथील स्वतंत्र विचारगट असलेल्या ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’ने (सिपरी) नुकताच एक अहवाल प्रकाशित केला आहे.
  • या अहवालानुसार 2020 ते 2024 या कालावधीत जगातील सर्व देशांत युक्रेनने सर्वाधिक शस्त्रास्त्रांची खरेदी केली आहे.
  • या यादीमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे सिपरीच्या अहवालात म्हटले आहे.
  • त्याचप्रमाणे या कालावधीत युरोपातील शस्त्रास्त्र आयातदेखील तब्बल 155 टक्क्यांनी वाढली असल्याचे नोंदविण्यात आले आहे.
  • भारत या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असला तरी 2015 ते 2019 या कालावधीच्या तुलनेत 2020 ते 2025 या कालावधीत भारताची आयात3 टक्क्यांनी कमी झाली असल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट होते.

2020 ते 2025 या कालावधीत सर्वाधिक शस्त्रास्त्र खरेदी करणारे देश

1) युक्रेन  8.8%

2) भारत  8.3%

3) सौदी अरेबिया 6.8%

4)पाकिस्तान 4.6 %

5) जपान 3.9%

6) ऑस्ट्रेलिया 3.5%

7) इजिप्त 3.3%

8) अमेरिका 2.9%

अहवालातील ठळक मुद्दे:

  • युक्रेन युद्धामुळे रशियाची शस्त्रास्त्र निर्यात तब्बल 64 टक्क्यांनी घटली
  • चीन निर्यातदारांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर असूनही अनेक देश चीनकडून शस्त्रास्त्र खरेदी टाळत आहेत
  • पाकिस्तानच्या पुरवठादांरात चीनचा सर्वाधिक अर्थात 81 टक्के वाटा
  • नाटो संघटनेचे सदस्य असलेल्या देशांकडून 2020 ते 2024 या कालावधित 2015ते 2019च्या तुलनेत 100 टक्क्यांहून अधिक शस्त्रास्त्र खरेदी
  • अमेरिकेच्या शस्त्रास्त्र निर्यातीत 2020 ते 2024 या कालावधित 2015 ते 2019च्या तुलनेत तब्बल 21 टक्क्यांनी वाढ
  • शस्त्रास्त्र आयात करणाऱ्या पहिल्या दहा देशांत आशिया खंडातील चार देशांचा समावेश

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *