Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

स्पा-डेक्स उपग्रहांचे यशस्वी’डी-डॉकिंग’

Successful 'de-docking' of SPA-DEX satellites

 स्पा-डेक्स उपग्रहांचे यशस्वी’डी-डॉकिंग’

  • भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) पुन्हा एकदा यशाला गवसणी घातली आहे.
  • “स्पेडेक्स’ उपग्रह वेगळे करण्याचा (अनडॉकिंग किंवा डिडॉकिंग) प्रयोग यशस्वी झाला असल्याचे ‘इस्रो’ने  जाहीर केले.
  • यामुळे चंद्राचे संशोधन, मानवी अंतराळ मोहीम आणि स्वतःचे अंतराळ स्थानक बांधणे, अशा भारताच्या भावी काळातील अंतराळ मोहिमांसाठी मार्ग खुला झाला आहे.
  • अंतराळात दोन उपग्रह एकमेकांना जोडण्याच्या प्रक्रियेला ‘डॉकिंग’ आणि वेगळे करण्याच्या प्रक्रियेला ‘अनडॉकिंग’ म्हणतात.
  • ‘इस्रो’ने 2024 मध्ये 30 डिसेंबरला ‘स्पेडेक्स’चे प्रक्षेपण केले. ‘डॉकिंग’ प्रयोगासाठी’एसडीएक्स 01′ आणि ‘एसडीएक्स 02’ हे दोन उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थापन केले होते.
  • ‘इस्रो’ने 16 जानेवारी दोन उपग्रह ‘डॉक’ करण्यात यश मिळविले होते. त्यानंतर 13 मार्च रोजी  सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी ‘स्पेडेक्स’ उपग्रहांचे ‘अनडॉकिंग’ करण्याची महत्त्वाचा प्रयोग पहिल्याच प्रयत्नात पूर्ण केला.
  • उपग्रहांचे ‘अनडॉकिंग’ 460 किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत आणि 45 अंशांच्या कोनात झाले.
  • दोन्ही उपग्रह आता स्वतंत्रपणे कक्षेत फिरत आहेत आणि त्यांचे कार्य सुरळीत सुरू आहे
  • वर्तुळाकार कक्षेत ‘डॉकिंग’ आणि ‘अनडॉकिंग’ करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व क्षमता ‘इस्रो’ने यशस्वीरीत्या प्रदर्शित केल्या आहेत.
  • ‘डॉक’ केलेल्या उपग्रहांच्या कक्षेत कामगिरीचे सखोल विश्लेषण करण्यात आले आणि 10 ते 25 मार्च दरम्यान ‘अनडॉकिंग’ची संधी असल्याचे लक्षात आले.
  • या सर्व प्रक्रियेवर ‘इस्रो’च्या बंगळूर, लखनौ आणि मॉरिशस येथील केंद्रांची देखरेख होती.

 

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *