Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

एकनाथ शिंदे यांना संत तुकाराम महाराज पुरस्कार जाहीर Sant Tukaram Maharaj Award announced for Eknath Shinde

Sant Tukaram Maharaj Award announced for Eknath Shinde

एकनाथ शिंदे यांना संत तुकाराम महाराज पुरस्कार जाहीर

 

  • जगगुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 375 व्या बीज सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा देहू संस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी केली.
  • बीज सोहळा ( 16 मार्च) देहू नगरीत साजरा होणार आहे.
  • या पवित्र सोहळ्यात वारकऱ्यांच्या उपस्थितीत शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
  • या पुरस्कारांतर्गत एकनाथ शिंदे यांना वैभवी पगडी, शाल, उपरणे, वीणा, चिपळ्या, पुष्पहार, संत तुकाराम महाराज मूर्ती, संत गाथा आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
  • शिंदे यांनी पंढरपूर वारीदरम्यान वारकऱ्यांच्या सेवा-सुविधांसाठी घेतलेल्या विशेष प्रयत्नांची आणि ‘निर्मल वारी, हरित वारी’ संकल्पनेत दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.
  • हा सन्मान 25 वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना देण्यात आला होता.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *