● मुंबईत बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित इंडिया स्टील 2025 या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेचेउत्साहवर्धक वातावरणात उद्घाटन झाले.
● परिषदेच्या पहिल्या दिवशी आयोजित कार्यक्रमांनी पुढील तीन दिवस चालणारा संवाद, सहकार्य आणि नवोन्मेशासाठीचे व्यासपीठ सज्ज केले.
● भारत सरकारचे पोलाद मंत्रालय आणि फिक्की (फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री), अर्थात भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या द्वैवार्षिक कार्यक्रमाने पोलाद उद्योगासाठी देशातील प्रमुख व्यासपीठ म्हणून पुन्हा एकदा आपले महत्व सिद्ध केले आहे.
● उद्घाटन सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले.
● देशांतर्गत पोलाद उत्पादन वाढविणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि मेक इन इंडियाला प्रोत्साहन देणे, या भारताच्या धोरणात्मक दृष्टीकोनावर त्यांनी यावेळी भर दिला.