Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

इतिहास अभ्यासक डॉक्टर नारायणन यांचे निधन Historian Dr. Narayanan passes away

Historian Dr. Narayanan passes away

● ज्येष्ठ इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ आणि भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेचे (आयसीएचआर) माजी अध्यक्ष डॉ. मुत्तयील गोविंदा मेनन शंकर नारायणन यांचे शनिवारी वृद्धापकाळाशी संबंधित आजारांमुळे वयाच्या 93 व्या वर्षी निधन        झाले.
● भारतातील सर्वांत प्रतिष्ठित इतिहासकारांपैकी एक असलेल्या डॉ. एम. जी. एस. नारायणन यांचा जन्म 20 ऑगस्ट 1932 रोजी झाला.
● आद्याक्षरांवरून ते एमजीएस म्हणून परिचित होते.
● त्यांनी मद्रास विद्यापीठात शिक्षण घेतले.
● तिथे त्यांनी प्रथम क्रमांकासह इतिहासात पदवीधर पदवी मिळवली.
● केरळ विद्यापीठाच्या इतिहासाच्या पदव्युत्तर विभागात रुजू होण्यापूर्वी त्यांनी कोळिकोडमधील गुरुवायुरप्पन अध्यापन केले. महाविद्यालयात
● केरळमध्ये सहा दशकांहून अधिक काळ एक प्रमुख सांस्कृतिक व्यक्तिमत्त्व राहिलेले डॉ. नारायणन 1976 ते 1990पर्यंत कालिकत विद्यापीठात इतिहास विभागाचे प्रमुख होते, तर 2001 ते 2003 पर्यंत ‘आयसीएचआर’चे अध्यक्ष होते.
● भारतीय इतिहासलेखनाच्या क्षेत्रात ठसा उमटवणारे डॉ. नारायणन ‘पेरुमल्स ऑफ केरळ’ या त्यांच्या पीएचडी प्रबंधासाठी प्रसिद्ध होते.
● डॉ. नारायणन 1976पासून भारतीय इतिहास परिषदेत सक्रिय होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *