● केरळमधील साक्षरता अभियानात मोलाचे योगदान देणाऱ्या आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्त्या के. व्ही. राबिया यांचे वयाच्या 59 व्या वर्षी निधन
झाले.
● त्यांनी दिव्यांग असूनही सामाजिक परिवर्तनाची मोठी चळवळ उभी केली.
● सामाजिक क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना 2022 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
● पोलिओमुळे वयाच्या 14 व्या वर्षीच दिव्यांग झालेल्या राबिया यांनी व्हीलचेअरवर अभ्यास करत घरातूनच शिक्षण पूर्ण केले होते.
● मलप्पुरम जिल्ह्यातील आपले मूळ गाव असलेल्या वेल्लिलाक्कडजवळील तिरुरंगडी येथे सर्व वयोगटातील निरक्षर प्रौढांसाठी साक्षरता मोहीम सुरू केली.
● समर्पणातून केलेल्या कार्यातून त्यांनी शेकडो निरक्षर प्रौढांना अक्षरांची ओळख करून दिली.
● ‘चलनाम’ नावाची स्वयंसेवी संस्था सुरू केली होती.
● निरंतर शिक्षण, आरोग्य आणि दिव्यांगांचे पुनर्वसन या क्षेत्रातही त्यांनी सक्रिय योगदान दिले.
● त्यांना 1994 मधील राष्ट्रीय युवा पुरस्कारामुळे देशस्तरावर ओळख मिळाली होती.
● 2002 मध्ये कर्करोगाचे निदान झाल्यानंतर केमोथेरपी उपचार घेत त्या सामाजिक कार्यात पुन्हा सहभागी झाल्या होत्या.
● त्यांनी 2009 मध्ये ‘स्वप्नांगलकु चिराकुकल उंडू’ (स्वप्नांना पंख असतात) हे आत्मचरित्र लिहिले होते.