● न्यू यॉर्क स्टेट सिनेटने प्रथमच भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवानिमित्त औपचारिकपणे एक ठराव मंजूर केला.
● या ठरावात भारतीय राज्यघटनेला भारताच्या एक राष्ट्र म्हणून प्रगतीसाठी मार्गदर्शक तत्त्व मानत देशाच्या लोकशाही मूल्यांचे कौतुक केले.
● जेरेमी कूनी हे न्यू यॉर्क स्टेट सिनेटमधील भारतीय वंशाचे एकमेव सदस्य आहेत. त्यांनी हा महत्त्वपूर्ण ठराव सादर केला आणि तो मंजूर करण्यात आला.
● या कार्यक्रमाला न्यू यॉर्कमधील भारताचे महावाणिज्यदूत बिनया प्रधान आणि न्यू यॉर्कमधील भारतीय-अमेरिकन समुदायातील प्रमुख सदस्य उपस्थित होते.