Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

कॅनडाच्या परराष्ट्रमंत्रीपदी भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची निवड Indian-origin Anita Anand elected as Canada’s foreign minister

  • Home
  • Current Affairs
  • Current Affairs 2025
  • May 2025
  • कॅनडाच्या परराष्ट्रमंत्रीपदी भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची निवड Indian-origin Anita Anand elected as Canada’s foreign minister
Indian-origin Anita Anand elected as Canada's foreign minister

● कॅनडा मध्ये एक नवा इतिहास रचला गेला आहे.
● देशातील ओकविल ईस्टच्या खासदार अनिता आनंद यांना कॅनडाच्या नव्या परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.
● पहिल्यांदाच एका हिंदू वंशाच्या महिलेला इतकं प्रतिष्ठित पद कॅनडामध्ये मिळालं आहे.
● 13 मे च्या दिवशी भगवद्गीतेवर हात ठेवून त्यांनी कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री म्हणून शपथ घेतली.
● त्यांच्यासह मणिंदर सिंधू, रुबी सहोता आणि रणदीप सराय हे सगळेही सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत.

कोण आहेत अनिता आनंद?

● 58 वर्षीय अनिता आनंद यांची आई सरोज तमिळी तर वडील एस. व्ही. आनंद पंजाबी वंशाचे डॉक्टर होते.
● अनिता या केंटविल, नोवा स्कॉटिया या ठिकाणी लहानाच्या मोठ्या झाल्या.
● क्वीन्स विद्यापीठ आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठ या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलं.
● 2018 मध्ये त्या ओकविलच्या खासदार झाल्या, त्यवेळी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये खासदार होणाऱ्या त्या पहिल्या हिंदू वंशाच्या नेत्या ठरल्या.

अनिता आनंद यांची राजकीय कारकीर्द

● अनिता आनंद या 2019 ते 2021 सार्वजनिक सेवा मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्यावर होती.
● करोना काळात कुणालाही लसी कमी पडणार नाहीत याची खबरदारी त्यांनी उत्तम पद्धतीने घेतली.
● त्यानंतर त्यांना संरक्षण मंत्रालय देण्यात आलं. त्यावेळी त्यांनी कॅनडातील सैन्यदलांचं आधुनिकीकरण केलं.
● आता परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे.
● आता विविध देशांशी असलेले व्यापार संबंध सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *