● जागतिक जैवविविधता दिन (International Day for Biodiversity) दरवर्षी 22 मे रोजी साजरा केला जातो.
● 2025 ची थीम “निसर्गाशी सुसंवाद आणि शाश्वत विकास” (Harmony with Nature and Sustainable Development) आहे.
● हा दिवस जैवविविधता (Biodiversity) जतन करण्यासाठी आणि तिच्या महत्त्वावर जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो.हा दिवस पर्यावरणाचे संरक्षण आणि शाश्वत विकासासाठी जनजागृती करतो.
इतिहास:
● हा दिवस 1992 मध्ये ब्राझीलमधील रिओ डी जेनेरो येथे झालेल्या पृथ्वी शिखर बैठकीनंतर सुरू झाला.
● संयुक्त राष्ट्रांनी 2000 मध्ये 22 मे या दिवशी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन (International Day for Biodiversity) म्हणून घोषित केले.
● या दिवसाच्या माध्यमातून, मानवांना जैवविविधतेचे महत्त्व आणि पर्यावरणाचे संरक्षण किती आवश्यक आहे, हे जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला जातो.