● आगामी 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फाउंडेशनला मिळाला आहे.
● अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.
● तब्बल 32 वर्षांनंतर सातारा येथे साहित्य संमेलन होणार असून, साहित्य संमेलनाच्या इतिहासामध्ये साताऱ्याला होणारे हे चौथे संमेलन असेल.
● नियोजित संमेलन स्थळ छत्रपती शाहू स्टेडियम हे आहे. योगायोग असा, की 1993 मधील 66 वे संमेलन इथेच झाले होते.
● हे स्टेडियम 14 एकरांत असून, तेथे मुख्य मंडप, दोन इतर मंडप, ग्रंथ प्रदर्शन, कवी गझल कट्टा, तसेच भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे.
साताऱ्यातील चौथे संमेलन
● लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी 1878 मध्ये ग्रंथकार संमेलन सुरू केल्यानंतर तिसरे संमेलन 1905 मध्ये रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात झाले होते.
● 1962 मध्ये न. वि. गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली 44 वे, तर 1993 मध्ये विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली 66 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात झाले होते.