● राष्ट्रपतींनी, 16 व्या वित्त आयोगाचे अर्धवेळ सदस्य म्हणून रिझर्व बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) डेप्युटी गव्हर्नर टी. रबी शंकर यांची नियुक्ती केली आहे. पदभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून आयोगाचा अहवाल सादर होईपर्यंत किंवा 31 ऑक्टोबर 2025, यापैकी जे आधी येईल तोपर्यंत ते हा कार्यभार सांभाळतील.
● टी. रबी शंकर यांची ही नियुक्ती 16 व्या वित्त आयोगाच्या पूर्णवेळ सदस्यांपैकी एक अजय नारायण झा यांच्या वैयक्तिक कारणास्तव दिलेल्या राजीनाम्यानंतर करण्यात आली आहे.
● 16 व्या वित्त आयोगाची स्थापना 31 डिसेंबर 2023 रोजी झाली होती. या आयोगाचे अध्यक्षपद नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ. अरविंद पनगडिया यांनी भूषवले आहे. आयोगाला 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणाऱ्या पाच वर्षांच्या कालावधीसाठीच्या शिफारसी 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत सादर करायच्या आहेत.