● जगातील सर्वांत मोठे मालवाहू जहाज एमएससी इरिना हे केरळमधील विझिंगम बंदरावर दाखल झाले.हे जहाज 10 जून पर्यंत या बंदरावर थांबणार असल्याचे मानले जाते.
● खोल समुद्रातील बंदर म्हणून विकसित करण्यात आलेल्या या बंदरामध्ये जगातील सर्वांत मोठ्या मालवाहू जहाजाचे आगमन हे या बंदराची क्षमता जागतिक पटलावर सिद्ध होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन मे रोजी या बंदराचे उद्घाटन झाले आहे.
● आकाराने महाकाय असलेल्या साहित्याची ने आण करण्यासाठी विशेषतः आशियाई आणि युरोप मधून साहित्याची ने आण करण्यासाठी या जहाजाची निर्मिती करण्यात आली होती.
● 2023 मध्ये जलावतरण करण्यात आले.
● एमएससी इरीना ची लांबी 399.9 मीटर असून रुंदी 61.3 मीटर आहे.