● वेस्ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज निकोलस पूरन याने वयाच्या 29 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे.
● पूरन हा वेस्ट इंडीजच्या टी-२० संघाचा कर्णधार होता, मात्र त्याने इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या टी-२० मालिकेतून माघार घेतली होती. त्यानंतर त्याने आता काही दिवसांतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाच गुडबाय केले आहे.
● वेस्ट इंडीजकडून तो सर्वाधिक १०६ टी-२० सामने आणि सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. या प्रकारात त्याने २६.१४ च्या सरासरीने आणि १३६.३९ च्या स्ट्राईक रेटने २२७५ धावा फटकावल्या आहेत, तर ६१ एकदिवसीय सामन्यांत त्याने ३९.६६ च्या सरासरीने आणि ९९.१५ च्या स्ट्राईक रेटने १९८३ धावा काढलेल्या आहेत.