● हरियाणाच्या सुरुची सिंग नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेतील सुवर्णवेधाची मालिका कायम ठेवली आहे.
● तिने सलग तिसऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत सुवर्णपदक – जिंकले.
● तिने म्युनिकला सुरू असलेल्या या वर्षातील तिसऱ्या वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये बाजी मारली.
● १९ वर्षीय सुरुचीने अंतिम फेरीत परिपक्वता दाखवली. पदक निश्चित करणाऱ्या अंतिम फेरीतील अखेरचे दोन शॉट शिल्लक असताना सुरुची दुसऱ्या क्रमांकावर होती. मात्र, तिने कामगिरी उंचावली आणि बाजी मारली.
● ती ब्यूनोस आयर्स आणि लिमा येथील या वर्षातील पहिल्या दोन वर्ल्ड कपमध्येही विजेती होती