● ब्रिटनच्या ‘एमआय-6’ या जगप्रसिद्ध गुप्तचर संघटनेच्या प्रमुखपदी ब्लेसी मेट्रिवेली यांची नियुक्ती झाली आहे.
● या संस्थेच्या 116 वर्षांच्या इतिहासात प्रथमच प्रमुखपद एखाद्या महिलेकडे आले आहे.
● पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी ही नियुक्ती केली आहे.
● या संस्थेच्या प्रमुखाला सर्वसाधारणपणे ‘सी’ या आद्याक्षराने ओळखले जाते. ‘एमआय-6’च्या सर्व कामकाजाची जबाबदारी आता मेट्रिवेली यांच्यावर असेल.
● ब्रिटनच्या सर्वांत पहिल्या गुप्तचर संघटनेच्या प्रमुखपदी रॉयल नेव्हीचे कॅप्टन मॅन्स्फिल्ड कमिंग होते. ते आपल्या आडनावाचे आद्याक्षर असलेल्या ‘सी’ या एकाच अक्षराची स्वाक्षरी करत. तेव्हापासून या पदाशी ‘सी’ हे अक्षर जोडले गेले ते कायमचेच.
● संस्थेचा प्रमुख हाच सार्वजनिकरित्या सर्वांना नावानिशी माहित असलेला संस्थेचा कर्मचारी असतो.
● मेट्रिवेली या आधी याच संस्थेत तंत्रज्ञान आणि संशोधन विभागाच्या महासंचालक, म्हणजेच ‘क्यू’ या पदावर होत्या.
● ब्रिटनमधील ब्रेन्ट शहरात ब्लेझ यांचा 1977 साली जन्म झाला. त्यांचे वडील रेडिओलॉजीच्या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि संशोधक होते.
● ब्लेझ यांनी केम्ब्रिज विद्यापीठातील पेमब्रोक महाविद्यालयातून सामाजिक मानववंशशास्त्राचा अभ्यास केला.
● त्या 1999 साली प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या.
● ब्रिटनची देशांतर्गत गुप्तचर संघटना असलेल्या ‘एमआय 5’ मध्ये त्यांनी संचालकपदाला समकक्ष पद भूषविले होते.
● त्यावेळी ‘डायरेक्टर के’ या सांकेतिक नावाने दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी ब्रिटनमधील हेरगिरीविषयक कायदे कालबाह्य झाल्याची टीका केली होती.
● व्लादिमीर पुतिन यांचा उल्लेख ‘कल्पनेपलीकडचे वादळ’ अशा शब्दांत केला होता. त्यांनी पश्चिम आशिया आणि युरोपात काम केले.
● स्थपना : 4 जुलै 1909
● मुख्यालय : लंडन