● तरुण पिढीच्या भावना आणि संघर्षाचे मार्मिक वर्णन करणाऱ्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या मराठी साहित्यिक प्रदीप कोकरे यांच्या कादंबरीला 2025 चा साहित्य अकादमी युवा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
● डॉ.सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ या कवितासंग्रहाला साहित्य अकादमीच्या बालसाहित्य पुरस्काराने गौरविण्यात आले.
● साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत 2025 सालच्या युवा साहित्य पुरस्कारांसाठी डोगरी भाषा वगळता 23 भाषांतील लेखकांच्या साहित्यकृतीची निवड करण्यात आली, तर बाल साहित्य पुरस्कारांसाठी 24 भाषांतील लेखकांच्या साहित्यकृती निवडण्यात आल्या.
● संबंधित भाषांच्या तीन सदस्यीय निवड समितीने सर्वसंमतीने किंवा बहुमताने केलेल्या
● शिफारशींनुसार पुरस्कारांसाठी पुस्तकांची निवड करण्यात आली.
● ग्लायनिस डायस यांच्या ‘गावगाथा’ या लघुकथा संग्रहाला कोकणी भाषेतील युवा पुरस्कार, तर नयना अडारकर यांच्या ‘बेलाबाईचो शंकर आणि हाएर कान्यो’ या कथासंग्रहाला कोकणी भाषेतील बालसाहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
● पुरस्काराचे स्वरूप : 50 हजार रुपये रोख आणि ताम्रपत्र असे आहे.
● पुरस्कारांसाठी निवड करण्यात आलेली पुस्तके जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यान प्रकाशित झाली आहेत.
● साहित्य अकादमीच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष समारंभात पुरस्कार प्रदान करण्यात येतील.