● दरवर्षी 21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा केला जातो. 2025 या वर्षी 11 वा योग दिन साजरा करण्यात आला
थीम
● या वर्षी २०२५ मध्ये, आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम ” एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग ” आहे.
● ही थीम वैयक्तिक कल्याण आणि ग्रहांच्या आरोग्यामधील संबंध अधोरेखित करते, पर्यावरणीय सुसंवाद, शाश्वतता आणि समग्र आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी योगाची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करते.
● ही थीम व्यक्ती आणि समुदाय दोघांसाठी योगाचे फायदे अधोरेखित करते आणि जी20 अध्यक्षपदाच्या काळात अधोरेखित झालेल्या “एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य” या भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.
पार्श्वभूमी:
● भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील भाषणात 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर त्यांच्या या प्रस्तावाला 177 देशांचा पाठिंबा मिळाला.
● सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा झाल्यानंतर 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रांनी दरवर्षी 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.
● त्यानंतर 21 जून 2015 रोजी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा करण्यात आला.
21 जून रोजीच का केला जातो योग दिन साजरा?
● 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यामागील एक कारण म्हणजे 21 जून हा जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो.
● कारण हा दिवस इतर दिवसांपेक्षा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो, ज्याला उन्हाळी संक्रांती म्हणतात.
● या दिवशी सूर्यप्रकाश पृथ्वीवर बराच काळ राहतो. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते.
● 21 जून रोजी सूर्योदय लवकर होतो आणि सायंकाळी जास्त वेळेपर्यंत उजेड असतो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होते. म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला.