● अन्य देशांच्या मार्गे प्रामुख्याने दुबई, युएई यासारख्या देशांद्वारे होणारी पाकिस्तानी बनावटीच्या वस्तूंची बेकायदेशीर आयात रोखण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ‘ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट ही मोहीम सुरू केली आहे.
● या कारवाईत आतापर्यंत 1,115 मेट्रिक टन माल वाहून नेणारे 39 कंटेनर जप्त करण्यात आले.
● या मालाची किंमत अंदाजे 9 कोटी रुपये आहे. यामधून पाकिस्तानी बनावटीच्या वस्तूंची प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष आयात किंवा वाहतुकीवर सरकारने लागू केलेल्या आयात धोरणाच्या अटी आणि निर्बंधांचे उघडपणे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होत आहे.
● ऑपरेशन सिंदूर” आणि सध्याच्या कडक सुरक्षा उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानमधून येणाऱ्या मालवाहतुकीला लक्ष्य करण्यासाठी डीआरआयने गुप्त माहिती गोळा करणे आणि डेटा विश्लेषण, याद्वारे आपली दक्षता वाढवली आहे. या सक्रिय देखरेखीमुळे मोठ्या किमतीचा माल जप्त झाला आहे.
● सध्याच्या प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षा विषयक धोक्यांच्या पार्श्वभूमीवर, “ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट” सरकारचे धोरण, सीमा शुल्क आणि इतर संबंधित कायद्यांची अंमलबजावणी करणे, देशाच्या राष्ट्रीय आणि आर्थिक सुरक्षेचे रक्षण करणे आणि पाकिस्तानी बनावटीच्या वस्तूंच्या आयातीसाठी व्यापार माध्यमांचा गैरवापर रोखण्याप्रति डीआरआयची दृढ वचनबद्धता दर्शवते.
● धोरणात्मक गुप्तचर यंत्रणा, लक्ष्यित अंमलबजावणी आणि आंतर-संस्था समन्वयाद्वारे, डीआरआय भारताच्या आर्थिक सीमा सुरक्षित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे.