● सिलिकॉनचा वापर टाळून जगातील पहिला संगणक तयार केला आहे.
● मागील अर्ध्या शतकात तंत्रज्ञानातील बहुतेक प्रगतीला गती देणाऱ्या सिलिकॉनला भविष्यात एक दिवस पर्याय देणे शक्य आहे, हे या निमित्ताने सिद्ध झाले असून, संशोधनातील हा एक मैलाचा दगड असल्याचे मानले जात आहे.
● अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटीच्या ‘नॅनो फॅब्रिकेशन युनिट’मध्ये संशोधन करणाऱ्या पथकाने ‘टू डायमेंशनल’ (टु-डी) पदार्थांपासून बनवलेल्या जगातील पहिल्या कॉम्प्लिमेंटरी मेटल-ऑक्साइड-सेमीकंडक्टर अर्थात ‘सीएमओएस’ संगणक तयार केला आहे.
● हा पदार्थ कागदाच्या थराएवढा पातळ असून, तो नॅनो स्तरावर कार्यक्षम असतो.
● ‘नेचर’ नियतकालिकात याबाबतचे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे.
● ‘सीएमओएस’ तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या रचनेमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.
● एकाच चिपवर ट्रान्झिस्टर, मेमरी सेल असे घटक बसवता येतात. ‘मॉडर्न मायक्रोप्रोसेसर’ आणि ‘मेमरी चिप’साठी ते आवश्यक असतात.
● या तंत्रज्ञानासाठी ऊर्जाही कमी खर्च होते.
● या संशोधनाला इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रातील पुढील टप्पा म्हणून पाहिले जात आहे.
● पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटीतील अभियांत्रिकी विज्ञान आणि यांत्रिकीचे प्राध्यापक; तसेच या शोधनिबंधाचे प्रमुख संशोधक सप्तर्षी दास यांनी संशोधनाबाबत माहिती दिली आहे.
● “सेन्सर आणि मेमरी उपकरणांमध्ये सिलिकॉनसह टू डायमेन्शनल उपकरणांचा उपयोग वाढवायचा असून, त्यामुळे उपकरण अधिक कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे