Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

‘इर्डा’ च्या प्रमुखपदी अजय सेठ यांची निवड Ajay Seth appointed as IRDA chief

Ajay Seth appointed as IRDA chief

● भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात ‘इर्डा’च्या (IRDAI : Insurance Regulatory and Development Authority of India) अध्यक्षपदी केंद्र सरकारने माजी वित्त आणि आर्थिक व्यवहार सचिव अजय सेठ यांची नियुक्ती घोषित केली.
● मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने सेठ यांची विमा नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा वय ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत नियुक्तीस मान्यता दिली.
● सेठ हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या कर्नाटकच्या 1987 च्या तुकडीचे सनदी अधिकारी आहेत.
● जून 2025 मध्ये ते केंद्रीय अर्थमंत्रालयातील आर्थिक व्यवहार सचिवपदावरून चार वर्षांच्या कार्यकाळानंतर निवृत्त झाले.
● देबाशीष पांडा यांनी मार्चमध्ये ‘इर्डा’चे अध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ पूर्ण करून घेतलेल्या निवृत्तीनंतर हे पद रिक्त झाले होते.

IRDAI

● इर्डा (IRDAI) म्हणजे भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण. ही एक सरकारी संस्था आहे जी भारतामधील विमा उद्योगाचे नियमन आणि विकास करते.
● इर्डाचे मुख्य उद्दिष्ट विमाधारकांच्या हितसंबंधांचे संरक्षण करणे आणि विमा उद्योगाचा विकास करणे आहे.
● स्थापना : 1999
● मुख्यालय : हैद्राबाद

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *