● भारतीय वंशाचे ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ आणि ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्सचे माजी सदस्य मेघनाद देसाई यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले.
● मेघनाद देसाई यांचा जन्म 1940 मध्ये गुजरातमध्ये झाला.
● त्यांनी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये 1965 ते 2003 इतका दीर्घकाळ अर्थशास्त्राचे अध्यापन केले.
● त्यांनी 1971 मध्ये मजूर पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आणि जून 1991 मध्ये ते ब्रिटिश संसंदेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्स या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य झाले.
● मेघनाद देसाई यांना 2008 मध्ये पद्मभूषण हा भारताचा तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
● भारत आणि ब्रिटनदरम्यानचे संबंध मजबूत करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली
● “देसाई यांनी अनेक महत्त्वाच्या कामांसाठी लक्षणीय योगदान दिले. त्यामध्ये ब्रिटिश संसदेमध्ये गांधी स्मृती पुतळा उभारण्याचाही समावेश आहे.