● आंतरराष्ट्रीय स्तरावर संघर्ष करणाऱ्या भारतीय पुरुष फुटबॉल संघाला नवी दिशा देण्यासाठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (AIFF) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
● ईस्ट बंगाल आणि मोहन बागान यांसारख्या दिग्गज क्लबचे माजी व्यवस्थापक आणि सध्या जमशेदपूर एफसीचे प्रशिक्षक असलेल्या खालिद जामिल यांची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
● या नियुक्तीमुळे तब्बल १३ वर्षांनंतर भारतीय फुटबॉल संघाला एक भारतीय मुख्य प्रशिक्षक मिळाला आहे.
● जामिल यांची निवड भारताचे माजी प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टंटाईन यांना मागे टाकत झाली आहे. जामिल हे तब्बल १३ वर्षांनंतर भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवणारे पहिले भारतीय ठरले आहेत. याआधी साविओ मडेरा यांनी ऑक्टोबर २०११ ते मार्च २०१२ या कालावधीत भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले होते.