● दशकभरातून अधिक काळ भारतीय क्रिकेट संघाच्या फलंदाजीचा कणा राहिलेल्या चेतेश्वर पुजाराने रविवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
● पुजारा कारकीर्दीत 2023 मध्ये अखेरचा 103 वा कसोटी सामना खेळला होता.
● पुजारा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये सौराष्ट्र आणि इंग्लिश काउंटी चॅम्पियनशिपमध्ये ससेक्स क्रिकेट क्लबकडून खेळला
पुजाराची कारकीर्द
● पुजाराने 103 कसोटीत 43.60च्या सरासरीने 7,195 धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 21,301 धावांची नोंद त्याच्या नावावर आहे.
● पुजाराने 2010 ते 2023 अशा कारकीर्दीत 19 शतके आणि 35 अर्धशतके झळकावली.
● राहुल द्रविडच्या निवृत्तीनंतर पुजारा भारतीय संघाच्या फलंदाजीचा कणा राहिला होता.
● ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 2018 आणि 2021 मधील मालिकेतील भारताच्या विजयात पुजाराची भूमिका महत्त्वाची राहिली होती.
● कसोटी पदार्पण : 9 ऑक्टोबर 2010 विरुद्ध ऑस्ट्रेलिया
● शेवटची कसोटी : 7 जून 2023 विरुद्ध ऑस्ट्रेलिया
● एकदिवसीय पदार्पण : 1ऑगस्ट 2013 विरुद्ध झिम्बाब्वे
● शेवटचा एकदिवसीय सामना : 19 जून 2014 विरुद्ध बांगलादेशएकदिवसीय
● जर्सी नं. 16