Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा – 2023

  • Home
  • Current Affairs
  • महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा – 2023

महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा – 2023

भारताच्या महिला बॉक्सिंगपटूंनी घरच्या प्रेक्षकांसमोर नवीन इतिहास घडवला. नवी दिल्ली येथे झालेल्या महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत नीतू घंगास 48 किलो आणि स्वीटीने 81 किलो प्रकारात तर निखत झरीनने 50 किलो वजनी गटात आणि लवलीना बार्गोहेन 75 किलो वजनी गटात जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. स्वीटी बुरा ने अंतिम फेरीत 81 किलो वजनी गटात चीनच्या वांग लिनाचा 4-3 असा पराभव केला. 48 किलो वजनी गटांमध्ये नितूने एकतर्फी लढतीत मंगोलियाच्या लूत्सायखान अल्तानतसेसेगचा 5 – 0 असा सहज पराभव केला. निखत झरीनने सलग दुसरे सुवर्णपदक जिंकताना 50 किलो वजनी गटात व्हिएतनामच्या एनगुएन थि टामचा 5-0 असा पराभव केला. इस्तंबूल येथे झालेल्या मागच्या वर्षीच्या (2022) स्पर्धेत निखतने सुवर्णपदक पटकावले होते. 75 किलो वजने गटात लवलीना बर्गोहेनने ऑस्ट्रेलियाच्या कॅलिन पार्कवर 5 -2 असा विजय मिळवला. जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंची सुवर्ण कामगिरी:-

1) एमसी मेरी कोम : (2002 ,2005 ,2006, 2008, 2010 ,2018) – सर्वाधिक सहा वेळा विजेतेपद

2) सरिता देवी : (2006)

3) जेनी आरएल : (2006)

4) लेखा केसी: (2006)

5) निखत झरीन :(2022, 2023)

6) नीतू घंघास: (2023)

7) स्वीटी बुरा :(2023)

8) लवलीना बार्गोहेन : (2023)

नवी दिल्ली येथे खेळवण्यात आलेली महिला जागतिक अजिंक्यपद स्पर्धा ही एकूण 13 वी स्पर्धा होती.

महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा सर्वप्रथम 2001 यावर्षी सुरू झाली.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *