महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्य परिवहन महामंडळाच्या विविध योजनांचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
1 मे 2023 या 63 व्या महाराष्ट्र दिनी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक’ या अभियानाची सुरवात करण्यात आली.
एसटीचे सदिच्छादूत म्हणून प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.



