- मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी अभिनेता राजकुमार राव याला राष्ट्रीय दूत म्हणून नियुक्त केले .
- मतदारांना निवडणूकित सहभागी होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे नेहमी लोकप्रिय प्रसिद्ध व्यक्तीचे राष्ट्रीय दूत म्हणून नियुक्ती केली जाते.
- आतापर्यंत सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, मेरी कोम, पंकज त्रिपाठी, आमिर खान यांच्यासारख्या लोकप्रिय व्यक्तींनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
- तेच काम आता राजकुमार राव करणार आहे.
- राजकुमार राव याने न्यूटन या चित्रपटांमध्ये नक्षलग्रस्त भागांमध्ये नेमणूक करण्यात आलेल्या निवडणूक अधिकाऱ्याची भूमिका केली होती.
- या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
- हा चित्रपट भारतातर्फे ऑस्करलाही पाठवण्यात आला होता.


