- ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता भारताचा भालाफेकपट्टू नीरज चोप्राणे आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदकाची कमाई केली.
- नीरजने आपलाच सहकार्य किशोर जेनाचे आव्हान परतावून लावत सोनेरी यश संपादन केले.
- किशोरने रौप्य पदक पटकावले.
- एकाच आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेकीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ.
- नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग दुसरे सुवर्णपदक मिळवले.
- मागील आशियाई क्रीडा स्पर्धेत 88.06 मीटर कामगिरीसह सुवर्णपदक मिळवले होते.
- यावेळी त्यांने 88.88 मीटर कामगिरीसह सुवर्णपदक पटकावले.
- आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकूण 81 पदके जिंकली आहेत.
- भारतीय खेळाडूंनी गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत(2022) 16 सुवर्ण, 23 रौप्य आणि 31 कांस्य अशी एकूण सत्तर पदके मिळवली होती.तीच आजवर सर्वाधिक पदके होती.
- आता मात्र भारताने यावेळी 18 सुवर्ण, 31 रौप्य आणि 32 कांस्यपदकासह एकूण 81 पदके मिळवत आशिया क्रीडा स्पर्धेतील आपली सर्वोत्तम कामगिरी केली आहे.(4 ऑक्टोबर पर्यंत)


