Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

मुंबई ,पुणे आणि कोकण कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची निवड (SELECTION OF VICE-CHANCELLORS OF MUMBAI, PUNE AND KONKAN AGRICULTURAL UNIVERSITIES)

  • Home
  • Current Affairs
  • मुंबई ,पुणे आणि कोकण कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची निवड (SELECTION OF VICE-CHANCELLORS OF MUMBAI, PUNE AND KONKAN AGRICULTURAL UNIVERSITIES)

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपती डॉक्टर रवींद्र कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉक्टर सुरेश गोसावी आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉक्टर संजय भावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील दहा महिने ते वर्षभरापासून राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये पूर्ण वेळ कुलगुरू नसल्याने प्रभारी अधिकाऱ्यांद्वारे कामकाज सुरू होते .अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर राज्यातील विविध विद्यापीठांना पूर्ण वेळ कुलगुरू मिळाले आहे. कुलपती तथा राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी या नियुक्त्या 6 जून 2023 रोजी जाहीर केल्या.

डॉक्टर रवींद्र कुलकर्णी ( कुलगुरू , मुंबई विद्यापीठ):
2018 ते 2022 या कालावधीत प्र- कुलगुरू म्हणून मुंबई विद्यापीठाचा कारभार पाहिला आहे. ते माटुंगा येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेत प्राध्यापक व ऑइल केमिकल्स आणि सर्फेटन्ट्स टेक्नॉलॉजी या विभागाचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण विज्ञान शाखेत पदव्युत्तर शिक्षण रासायनिक तंत्रज्ञान या विषयात पूर्ण केले. रासायनिक तंत्रज्ञान या विषयात पीएचडी केली आहे. औद्योगिक क्षेत्रातील टाकाऊ पदार्थापासून मूल्यवर्धित उत्पादने विकसित करण्याच्या प्रक्रियेवर त्यांनी संशोधन केले आहे. ऑइल टेक्नॉलॉजीज असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन आणि एशियन पॉलिमर असोसिएशनचे ते अजीवन सदस्य आहेत. आतापर्यंत त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर 59, राष्ट्रीय स्तरावर 19 शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांनी 66 आंतरराष्ट्रीय आणि 46 राष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहे.

डॉक्टर सुरेश गोसावी : कुलगुरू ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ:

डॉक्टर सुरेश गोसावी हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक आहेत. डॉक्टर गोसावी यांनी पदव्युत्तर शिक्षण विज्ञान शाखेत पूर्ण केले असून पी.एचडीही संपादन केली आहे.त्यांचे विविध विषयांवर आधारित शोध निबंध प्रकाशित झाले आहेत. प्लाझ्मा पॉलीमरायझेशन वापरून लिथोग्राफी आणि नमुना हस्तांतरण, ट्राय इलेक्ट्रॉन बीम संश्लेषण, मल्टी- इलेक्ट्रॉन बीम लिथोग्राफी सिस्टीम डिझाईन अँड डेव्हलपमेंट, नॅनोमटेरियल आणि नॅनो टेक्नॉलॉजी मायक्रोफ्लुइडीएक्स, स्टॉप लिथोफी, फोटो इमेजबेल थिक फिल्म टेक्नॉलॉजी हे त्यांचे संशोधनाचे विषय आहेत.

 डॉक्टर संजय भावे:  कुलगुरू, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ:

डॉक्टर संजय भावे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असून कोकण कृषी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत . त्यांनी याच विद्यापीठातून अनुवंशिकता आणि वनस्पती प्रजनन या विषयात आचार्य पदवी प्राप्त केली आहे . गेले 33 वर्षे ते या विद्यापीठात विविध पदावर कार्यरत आहेत त्यांनी त्यांच्या नोकरीची सुरुवात सहाय्यक प्राध्यापक या पदापासून केली होती त्यानंतर ते सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, विभाग प्रमुख, सहयोगी अधिष्ठाता, संचालक, विस्तार शिक्षण या पदावर काम केले आहे. सध्या ते विद्यापीठांमध्ये संशोधन संचालक या पदावर कार्यरत आहेत. एक संशोधक म्हणून त्यांनी आतापर्यंत विविध तृणधान्य, कडधान्य आणि गळीत धान्य, पिकांच्या 21 जाती विकसित केले आहेत. लाल भाताचे रत्नागिरी-7 आणि रत्नागिरी-8या जाती विकसित करण्यात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *