Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडून “व्यसनमुक्त अमृत काळ” ही राष्ट्रीय मोहीमेला सुरवात (“VYSAN MUKT AMRUT KAAL” BY THE NATIONAL COMMISSION FOR PROTECTION OF CHILD RIGHTS)

  • Home
  • Current Affairs
  • राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडून “व्यसनमुक्त अमृत काळ” ही राष्ट्रीय मोहीमेला सुरवात (“VYSAN MUKT AMRUT KAAL” BY THE NATIONAL COMMISSION FOR PROTECTION OF CHILD RIGHTS)

जागतिक तंबाखू दिनानिमित्त, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) 31 मे 2023 रोजी एनसीपीसीआर येथे “व्यसनमुक्त अमृत काळ” ही राष्ट्रीय मोहीम यशस्वीपणे सुरू केली.

निरोगी आणि व्यसनमुक्त भारताला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरु केलेली ही मोहीम तंबाखू आणि अंमली पदार्थमुक्त राष्ट्र निर्माण करण्याच्या मोहिमेतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

टोबॅको फ्री इंडिया या नागरिकांच्या समूहासोबत तांत्रिक भागीदारीच्या सहकार्याने राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने या मोहिमेचे आयोजन केले आहे. ही मोहीम देशातील लहान मुलांमधील तंबाखू आणि अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेची समस्या सोडवण्याचा प्रयत्न आहे.

ओटीटी मंचावर तंबाखूच्या वापराचे चित्रण नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारने अलीकडेच लागू केलेल्या  नियमांचे  राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो आणि सहभागींनी स्वागत केले.

अप्रत्यक्ष तंबाखू सेवनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या मुलांना शाळांमध्ये स्थापन केलेल्या ‘प्रहरी क्लब’चे सदस्य बनवण्यात आले आहे, असे त्यांनी ही अनोखी मोहीम अधोरेखित करत नमूद केले. “आम्ही आतापर्यंत अशा प्रकारचे 60,000 क्लब तयार केले आहेत. या ‘प्रहरी क्लब’चा उपयोग भारताला तंबाखू आणि अंमली पदार्थांपासून मुक्त करण्यासाठी करता येईल,” असे ते म्हणाले. अशाप्रकारचे क्लब  सरकारचे डोळे आणि कान म्हणून काम करतील आणि मुलांच्या शाळेजवळ तंबाखू विक्रीची दुकाने असल्यास माहिती देतील.

‘विज्ञान भारती’चे राष्ट्रीय सचिव आणि कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रवीण रामदास यांनी व्यसनमुक्तीसाठी पारंपरिक पद्धती आणि समग्र दृष्टिकोनांना चालना देण्यासाठी शैक्षणिक संस्थांच्या भूमिकेवर भर दिला.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *