Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे निधन

  • Home
  • Current Affairs
  • ज्येष्ठ शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे निधन

ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. मालिनी राजूरकर यांचे ‘ख्याल’ आणि ‘टप्पा’ या गायन प्रकारावर विशेष प्रभुत्व होते. अभिजात संगीताच्या प्रचारासाठी त्या सतत प्रयत्नशील राहिल्या.

अल्पपरिचय:

ग्वाल्हेर घराण्याचे परंपरा समृद्ध करणाऱ्या वझेबुवा आणि त्यांची गुरुजी निसार हुसेन खान, भूगंधर्व रहमत खान, वासुदेवबुवा जोशी पंडित, विष्णू दिगंबर पलूसकर, ओंकारनाथ ठाकूर यांची परंपरा कायम ठेवणारा आवाज म्हणून त्यांची ख्याती होती. मालिनी राजूरकर यांचा जन्म 1941 मध्ये अजमेर येथे झाला. त्यांची जडणघडण तेथेच झाली. गणित या विषयात पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी अजमेर मधील सावित्री माध्यमिक शाळा व महाविद्यालयीन तीन वर्षे गणिताचे अध्यापन केले. अजमेर संगीत महाविद्यालयात गोविंदराव राजुरकर आणि त्यांचे पुतणे वसंतराव राजुरकर यांच्याकडे संगीताचे पुढील धडे घेतले. राजूरकर यांना 2001 मध्ये ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *