- रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
- लंडनमध्ये झालेल्या ‘सेंट्रल बँकिंग पुरस्कार 2023’ कार्यक्रमांमध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .
- आव्हानात्मक काळात केलेली कामगिरी, कोविड साथीच्या काळात घेतलेले निर्णय आणि महागाईचे कार्यक्षम व्यवस्थापन यासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.
- ‘गव्हर्नर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित होणारे शक्तीकांत हे दुसरे गव्हर्नर आहेत.
- यापूर्वी 2015 मध्ये रघुराम राजन यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते .
- दास यांच्या नेतृत्वाखाली रिझर्व बँकेने अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणले असून अनेक प्रभावी उपाययोजना केले आहेत. त्यांच्या कार्यकाळात युनिफाईड पेमेंट इंटरफेसचा (यूपीआय) झपाट्याने विस्तार झाला.
शक्तीकांत दास:
- जन्म:- 26 फेब्रुवारी 1957, भुवनेश्वर, ओडिशा
- शक्तीकांत दास यांनी दिल्लीतील स्टीफन्स कॉलेजमधून पदव्युत्तर पदवी घेतली असून 1980 च्या तुकडीतील ते आयएएस अधिकारी आहेत .
- मे 2017 पर्यंत ते आर्थिक व्यवहार सचिव होते.
- दास यांनी 15 व्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणूनही काम केले असून ब्रिक्स, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि सार्क मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
- ऊर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर 12 डिसेंबर 2018 रोजी रिझर्व बँकेचे 25 वे .गव्हर्नर म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला


